जळगाव - रिक्षात बसवण्याच्या वादातून पिंप्राळा हुडकाेत साेमवारी रात्री दाेन गटात दंगल झाली. यात सात जण जखमी झाले अाहेत. प्रार्थनास्थळांवर दगडफेकीसह दाेन दुकाने जाळण्याचा प्रयत्न झाल्याने तणाव निर्माण झाला हाेता. दगडफेकीत एक बकरीचा मृत्यू झाला.
जळगाव शहरातून पिंप्राळा हुडकाेत जाणाऱ्या रिक्षेतून नेले नाही. या क्षुल्लक कारणावरून हुडकाेत राहणाऱ्या उज्ज्वला साेनवणे रिक्षाचालक शेख जावेद शेख लुकमान यांच्यात रिंगराेड रिक्षा थांब्यावर वाद झाला. त्यानंतर लुकमानच्या घरात घुसून मारहाण करण्यात अाली. तसेच सात हातगाड्या उलटवून दगडफेक झाली. त्यानंतर हा वाद वाढत जाऊन दाेन्ही गटात हाणामारी झाली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला हाेता. त्याची माहिती मिळताच तीन दंगा नियंत्रण पथकासह चार पाेलिस ठाण्यातील पाेलिसांनी पिंप्राळा हुडकाेला वेढा घातला. पाेलिस अधीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर रस्त्यावर उतरत दंगल नियंत्रणात अाणण्यासाठी प्रयत्न करीत हाेते. गुन्हा नाेंदवण्याचे काम, रात्री उशिरापर्यंत सुरू हाेते.
पुढे वाचा.. दगडफेकीत सात जण जखमी, दंगलीमुळे दीड तास तणाव, दोन्ही गटांच्या १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल