आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाघूर नदीकाठच्या गावांनाही पुराचा धोका!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - वाघूरच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला असला तरी आतापर्यंतची सर्वाधिक पातळी वाढीचा उच्चांक अद्याप मोडलेला नाही. धरण भरल्यावर गेट उघडून पाणी सोडण्यायोग्य साठा अद्यापही झालेला नाही. पावसासंदर्भात अचूक अंदाज वर्तवणे कठीण असले तरी सद्य:स्थिती पाहता येत्या दोन दिवसांत वाघूर नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वाघूरची जलपातळी शुक्रवारी सायंकाळपर्यंत 226.100 मीटरपर्यंत नोंदवली गेली आहे. यापूर्वी 19 सप्टेंबर 2011 रोजी धरणातील सर्वाधिक पातळी 229.350 मीटरपर्यंत नोंदवली गेली आहे. तीन मीटर जलपातळी वाढल्यावर जुना उच्चांक मोडला जाऊ शकतो. दोन महिने अद्याप पावसाळा बाकी असून यंदा पावसाची स्थिती पाहता नवा उच्चांक गाठला जाऊ शकतो. सन 2008 मध्ये धरणावर एकूण 20 वक्राकार दरवाजे बसवण्याचे काम पूर्ण झाले होते. तेव्हापासून एकदाही दरवाजे उघडून पाणी सोडण्याची वेळ आलेली नाही. 234.100 मीटरपर्यंत जलपातळी झाल्यास धरणातील साठा 325.287 दशलक्ष घनमीटर होतो. सद्याची जलपातळी 226.100 मीटर असून यातील साठा 36.789 दशलक्ष घनमीटर आहे. धरणाच्या वरच्या बाजूची साठवण क्षमता प्रचंड असल्याने अजून 8 मीटर जलपातळी वाढण्यास अजून पावसाची गरज आहे.