आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेटॅडोअरच्या धडकेत 3 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - तालुक्यातील नेर शिवारात दोन मेटॅडोअरमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे वाहनांमधील प्रवासी विठ्ठल ठाकरे, सपना पाटील व मनीषा पाटील हे ठार झाले. याशिवाय सहा महिन्याच्या बालिकेसह तिघे जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनांवर दुचाकी आदळल्याची माहिती पोलिसांनी दिली.

साक्रीहून धुळ्याकडे येणारा मेटॅडोअर (एम.एच.19/5752) मधून अवैधरित्या प्रवाशी वाहतूक करण्यात येत होती. नेर शिवारात लोढा नाल्याजवळ तसेच अमोल हॉटेलपासून काही अंतरावर साक्रीच्या दिशेने जाणारा मेटॅडोअर (एम.एच.03/एन.5305) ने समोरून येणार्‍या मेटॅडोअरला धडक दिली. या अपघातात विठ्ठल पांडुरंग ठाकरे (42,रा.विखरण,ता.शिरपूर), सरला वनराज पाटील (45,रा.सोनखेडी, ता. अमळनेर), मनीषा दीपक पाटील (35,वडोदरा,ता.चलथान, सुरत) हे ठार झाले. तर विजया एकनाथ पाटील (25), अक्षरा एकनाथ पाटील (सहा महिने), ऋषिकेश एकनाथ पाटील (5,तिघे रा.ढोमणे, ता.चाळीसगाव) हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.