आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसस्टॉपवर अतिक्रमण अन‌् खोल साइटपट्ट्यांची जोखीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महामार्गावरील बसथांब्यावर बस रस्त्याच्या खाली उतरवण्यासाठी एसटी महामंडळ देखील सकारात्मक आहे. थांब्यावर बस थांबविण्यासंदर्भात आम्ही तत्काळ कार्यवाही करू. परंतु, थांब्यावरील खासगी वाहनांचे अतिक्रमण आणि अर्ध्या फुटापर्यंत खाली गेलेल्या साइटपट्ट्यांसाठी संबंधित विभागांनी सहकार्य करण्याची अपेक्षा महामंडळातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.

शहराच्या हद्दीत महामार्गावर दिलेले बस थांबे अतिक्रमणामुळे हरवल्याचे वृत्त शनिवारी ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले. त्यावर महामंडळाने बस थांब्यांवर बस उभी करण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु यासाठी इतर संबंधित शासकीय विभागांनी सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

२०१२पासून साइटपट्ट्या तशाच
शहरहद्दीमध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या दाैऱ्यानिमित्त दोन वेळा साइटपट्ट्या भरण्यात आल्या होत्या. २०१२ नंतर शहरात साइटपट्ट्या भरण्यात आलेल्या नाहीत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या हद्दीच्या वादात साइटपट्ट्या अनेक ठिकाणी थेट एक फुटापर्यंत खाली गेलेल्या आहेत. त्याच महामार्गावरील अपघातांचे प्रमुख कारण बनल्या आहेत.

थांब्यांवर अतिक्रमण
महामार्गावरीलबहुतांश थांब्यांवर अतिक्रमण झाले आहे. काही ठिकाणी हाॅटेल, हातगाड्या लावण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी खासगी वाहने उभी राहतात. अशा वेळी थांब्यावर बस उभी केल्यास ती पार्क करणे आणि पुन्हा बाहेर काढणे शक्य होत नाही. त्यामुळे अतिक्रमण हा देखील एस.टी. महामंडळाच्या दृष्टीने तांत्रिक अडचणीचा मुद्दा आहे.

अपघातहोण्याची शक्यता
कोंठेअर्धा फूट तर कोंठे फूटभर खोल गेलेल्या साइटपट्ट्यांवरून बस रस्त्याच्या खाली उतरवणे धाेक्याचे आहे. प्रवाशांनी भरलेली बस अशा साइटपट्टीवरून उतरताना अपघात होऊ शकतो. रस्त्याच्या खाली उतरलेली बस पुन्हा रस्त्यावर चढवताना उंच साइटपट्टी अडचणीची ठरते. अशा वेळी गाडीचे टायर खराब अथवा फुटण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. त्यामुळे बस खाली उतरवण्यासाठी डांबरी रस्ता आणि शेजारची जमीन हे समांतर असले पाहिजे. तांत्रिकदृष्ट्या साइटपट्टी योग्य असणे आवश्यक