आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Road Block Will Clear, Vegetable Sellers Shifting Is Certain

रस्त्यांची कोंडी फुटणार; भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर अटळ !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील सगळ्यात गर्दीचे ठिकाण झालेल्या घाणेकर चौक परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांच्या स्थलांतराला औरंगाबाद खंडपीठाने हिरवी झेंडी दाखवली आहे. विक्रेत्यांनी दाखल केलेली याचिका निकाली काढत राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार पर्यायी जागा देण्याचे आदेश खंडपीठाने दिलेले आहेत. सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यासही खंडपीठाने नकार दिला आहे. त्यामुळे आता रस्ते मोकळे होणार आहे.

शहरातील सुभाष चौक, घाणेकर चौक बळीरामपेठेतील भाजीपाला, फूल फळविक्रेत्यांच्या स्थलांतराचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार राष्ट्रीय फेरीवाला धोरण समितीची बैठक डिसेंबर २०१४ रोजी घेण्यात आली होती. त्यात महापालिकेने विक्रेत्यांना गोलाणी मार्केटसह अन्य मार्केटमधील जागा उपलब्ध करून देत स्थलांतराची तयारी केली होती. या निर्णयाविरुद्ध २७६ जणांनी दिवाणी न्यायालय त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. परंतु, सत्र न्यायालयाने विक्रेत्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. म्हणून विक्रेत्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. आतापर्यंत न्यायालयाने कारवाई करण्यास स्थगिती दिली होती. जुलैला न्यायमूर्ती आर.व्ही.घुगे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यात न्यायालयाने आपल्या आदेशात जळगाव महापालिका त्यांच्या पद्धतीने राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करीत आहे. समितीच्या बैठकीतही पालिकेने विक्रेत्यांना पर्यायी जागा देण्याचे स्पष्ट केले आहे; अशा परिस्थितीत जिल्हा दिवाणी न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. ज्या याचिकाकर्त्यांना पर्यायी जागा हवी असेल त्यांनी त्वरित संपर्क साधावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. विक्रेत्यांच्या वतीने तोंडी युक्तविदात १५ दिवसांची मुदत मागितली मात्र न्यायालयाने आदेशात उल्लेख करता ती मागणीही नाकारली आहे. पालिकेच्या वतीने अॅड.पी.आर.पाटील तर विक्रेत्यांतर्फे अॅड.विजय बी.पाटील यांनी काम पाहिले.

टॉवर चौक ते चौबे शाळेपर्यंतच्या रस्त्यावर विक्रेते दुकाने लावतात. तसेच नागरिक रस्त्यामध्येच वाहने उभी करत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. गेल्या आठवड्यात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने या रस्त्यावर वाहने लावणा-यांवर हॉकर्सवर कारवाई केली होती; परंतु मंगळवारी या रस्त्यावर ‘जैसे थे’ परिस्थिती पाहण्यास मिळाली .

विक्रेत्यांना ७५० गाळे वाटप होणार
खंडपीठाने याचिकाकर्त्यांना पर्यायी जागा हवी असल्यास पालिकेशी संपर्क करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता महापालिका रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणा-या विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यास मोकळी आहे; अशा परिस्थितीत गोलाणीतील ५००, बालाजी मंदिराजवळील १०० भास्कर मार्केटमधील १५० गाळे विक्रेत्यांना वाटप करण्याची शक्यता आहे. जे आधी येतील त्यांना या गाळ्यांचा लाभ दिला जाऊ शकतो.