आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहिरातीची फलके निघाली; खड्डे ‘जैसे थे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पालिकेतर्फे शहरात लावण्यात येणार्‍या जाहिरात फलकासाठी मक्ता दिला होता. या मक्त्याची मुदत संपल्याने संबंधितांकडून जाहिरातीचे पोल काढले जात आहेत. हे काढताना मोठमोठे खड्डे तसेच कमी अधिक प्रमाणात बुजून सोडून दिले जात आहेत.

महापालिका हद्दीत लागणार्‍या जाहिरातींवर कर आकारणी करण्यासाठी पालिकेतर्फे मक्ता देण्यात आला होता. अँब्लिकॉमतर्फे तीन वर्षांसाठी हा मक्ता घेण्यात आला होता. मक्त्याची मुदत 31 ऑक्टोबर रोजी संपली आहे. त्यामुळे मक्तेदाराकडून जाहिरात लावण्यासाठी ठिकठिकाणी गाडलेले पोल काढण्याचे काम सुरूआहे.

रस्ता दुभाजकामधील पोल काढताना झाडांसाठी टाकलेल्या मातीत सिमेंट कॉँक्रिट तोडून टाकून दिले जात आहे. काही मोठे पोल काढून झाल्यावर काही ठिकाणी खड्डय़ात माती टाकली जात आहे तर काही ठिकाणी खड्डे न बुजताच सोडून दिले जात आहेत. पोल काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर खड्डे बुजविले जात आहेत. काही राहून गेल्यास पाहणी करून व्यवस्थित बुजविण्यात येणार असल्याचे मक्तेदार प्रसाद जगताप यांनी ‘दिव्य मराठी’ ला सांगितले.