आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुरुमाने केली दमछाक; खड्डय़ांसाठी हवे ‘कोल्डमिक्स’ तंत्रज्ञान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- पालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांवर मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला असला तरी सध्या पावसाने उघडीप दिल्याने मुरुमाचा धुराडा प्रत्येक रस्त्यावर उडत आहे. नागरिकांच्या नाकातोंडात मुरुमाचे कण जात असल्याने शहरातील खड्डय़ात आता कोल्डमिक्स तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक झाले आहे.

पावसाळ्यात पडणारे खड्डे आणि ते बुजवण्यासाठी अडथळा निर्माण होत असून शहरातील रस्त्यांची तर अवस्थाच गंभीर आहे. पालिका प्रशासनाने शहरातील खड्डय़ांमध्ये मुरूम टाकून ते बुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता पावसानंतर उघडीप मिळाल्याने वाहनांच्या वापराने मुरुमाचा धुराडा उडत आहे. शहरातील बहुतांश रस्त्यावरचा मुरूम धुराड्यात उडाल्याने पुन्हा मुरूम टाकण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. शहरवासीयांकडून कमालीची ओरड होत असल्याने पालिका प्रशासनाने आता रस्त्यांच्या खड्डयांवर कोल्डमिक्सचा वापर करणे आवश्यक बनले आहे. पावसाळ्यातही कोल्डमिक्स (खच, डांबर आणि रसायनांचे मिश्रण) वापरणे शक्य असल्याने पालिकेने त्या अनुषंगाने प्रयत्न करावे, असा सूर उमटू लागला आहे. शहरातील जामनेररोड, यावलरोड, वरणगावरोड, स्टेशनरोड, हंबर्डीकर चौक परिसर आदी भागातील मुरूम रस्त्यावरील वाहनांमुळे इतरत्र पसरला आहे.

यावल रोडकडे पालिकेचे दुर्लक्ष
शहरातील यावलरोडवर मुरूम टाकण्याकडेही पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. निरंतर पावसामुळे या रस्त्यावरील खड्डय़ांचा आकारही दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गजानन महाराज मंदिरासमोर एका व्यापार्‍याने स्वखर्चातून दुरूस्ती करून दिली. पालिक ा प्रशासनाने मात्र काही खड्डयांमध्येच मुरूम टाकून रस्त्याच्या स्थितीकडे कानाडोळा केला आहे.

असा आहे फायदा
डांबरीकरण करताना कचखडी, इम्युलेशन गरम करून ते द्रवरुपात आणले जाते. ते तत्काळ खड्डय़ांमध्ये टाकल्यावर टणक होते. कोल्डमिक्समध्ये डेट्युमेनचा वापर केला जातो. हा घटक कचखडीत मिसळल्यानंतर बॅगेत पॅक करूनही पाठवता येतो. इम्युलेशनचा वापर करून केलेले डांबरीकरण पावसाळयात टिकत नाही. कोल्डमिक्स गरम करण्याची आवश्यकता नसते. खड्डयांतील पाणी काढून केवळ पॅच मारुन कोल्डमिक्स वापरता येते. विशेष म्हणजे ते पावसातही टिकून राहते.

कोल्डमिक्सबाबत प्रयत्न
शहरातील खड्डय़ांची स्थिती पावसामुळे खराब झाली असून मुरूमही टिकेनासा झाला आहे. कोल्डमिक्सबाबत आधी चर्चा करून त्याची माहिती काढण्यात येईल. शहरातील रस्त्यांवर यापूर्वी मुरूम टाकला आहे. यावर कोल्डमिक्स बसेल काय? याची चौकशी केल्यानंतर याबाबत विचार करू.
- अनिल जगताप, मुख्याधिकारी, भुसावळ