आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात खड्डे चुकवा अन् थेट बक्षीस मिळवा स्पर्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरातील खराब रस्त्यांकडे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी शिवसेनेने मुख्याधिकार्‍यांना मानेचे पट्टे, पेनकिलर औषधी, झेंडू बाम भेट दिला होता. तरीही पालिकेने उपाययोजना न केल्याने आता सेना अधिक आक्रमक झाली आहे. ‘खड्डे चुकवा बक्षीस मिळवा’ या सायकल स्पर्धेतून पुन्हा खराब रस्त्यांचा विषय ऐरणीवर आणला जात आहे.

7 सप्टेंबरला जुना सतारे येथील शिवसेना शाखा कार्यालयापासून ही स्पर्धा सुरू होईल. मामाजी टॉकीज, मच्छी मार्केट, दगडीपूल, कळसकर बिल्डिंग, लोखंडी पूल, गांधी पुतळा आणि जळगाव रोडमार्गे पुन्हा जुने सतारेत येऊन स्पर्धेचा समारोप होईल. जो स्पर्धक एका खड्डय़ातून सायकलचे चाक जाऊ न देता ठरलेला मार्ग पूर्ण करेल, त्याला विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. अनुक्रमे पहिल्या तीन विजेत्यांना 1501, 1001 आणि 501 रुपये रोख आणि प्रमाणपत्र बक्षीस म्हणून देण्यात येईल. स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उप जिल्हा प्रमुख सुकदेवराव निकम, माजी तालुका प्रमुख मनोज बियाणी, पालिकेतील गटनेते किरण कोलते, पप्पू बारसे आदी उपस्थित राहतील. तर विशेष आमंत्रितांमध्ये मुख्याधिकारी अनिल जगताप यांचा समावेश असल्याची माहिती विद्यार्थी सेनेचे उप जिल्हाप्रमुख दीपक धांडे, नगरसेविका शारदा धांडे यांनी दिली.