आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दमदार पावसाने केले रस्त्यांच्या कामांचे ‘अाॅडिट’; अनेक भागांत रस्ते उखडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरात रविवारी तब्बल दीड महिन्यांनतर दमदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील प्रमुख मार्गासह इंद्रप्रस्थनगर, शिवाजीनगर, रिंगरोडसह अनेक भागात रस्त्याचे बारा वाजले असून ठिकठिकाणी माेठ माेठे खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाली अाहे. एवढेच नव्हे तर विसर्जन मार्गावर करण्यात अालेली डागडुजी उखळली असून रस्ता ‘जैसे थे’ झाला अाहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या कामाचे वाभाडे निघाले असून पावसाने मनपाचे खऱ्या अर्थाने ‘अाॅडीट’ केल्याचे बाेले जात अाहे.
 
वरुणराजा रविवारी धो-धो बरसला. मात्र, या दमदार पावसाने शहरातील सर्वच रस्ते पूर्णपणे उखडले गेले. त्यामुळे प्रमुख मार्गांवर असलेले लहान खड्डयांचे आता मोठ्या खड्ड्यांमध्ये रुपांतरित झाले आहेत. आधीच्या खड्डेमय रस्त्यांची पूर्णपणे चाळणी झाल्याने जळगावकरामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवाजीनगरातून दूध फेडरेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर हनुमान मंदिराजवळील रस्ता हा पूर्णपणे खड्डेमय होऊन अपघाताला आमंत्रण देत आहे. हीच स्थिती रेल्वेगेटजवळील रिंगरोडसह महाबळ रस्त्यावर आहे. पुढील आठवड्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने महापालिकेने या रस्त्यांची मजबूत डागडुजी दुरुस्ती करावी, अशी मागणीही नागरिकांमधून केली जात आहे. 

शिवाजीनगरकडून दूध फोडरेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून त्यातून मार्गक्रम होताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुसऱ्या छायाचित्रात संभाजीनगरात रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यातून जाताना कार. 

महापालिकेचे पथक कार्यरत 
आरोग्य आणि बांधकाम विभागाच्या चार पथकांनी सोमवारी सकाळपासून साफसफाई मोहीम राबवली. चार जेसीबी मशिनीद्वारे रिधूर नाला, म्हाडा कॉलनी, आशाबाबानगर, इंद्रप्रस्थनगर, कानळदा रोड, सिव्हिल या भागात नाल्यातील गाळ काढून गटारींतील पाण्याची वाट मोकळी केली. 
- डॉ.विकास पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा 

शहरातील रेल्वेस्टेशन ते नवीन बसस्थानक, टॉवर चौक, भिलपुरा चौक, रथचौकमार्गे मेहरूण तलावापर्यंतच्या रस्त्यांची महापालिकेने नुकतीच माती, कच टाकून डागडुजी केली होती. मात्र, पावसामुळे आता या ठिकाणावरील पूर्ण कच वाहून गेल्याने खड्डे पूर्ववत दिसू लागले आहेत. 

नवीपेठ, गणेश कॉलनी रोड, चित्रा चौक या भागातील खड्डेही अधिक खोलवर गेल्याने जळगावकरांचा खड्डेमय प्रवास अधिक वाढला आहे. त्यामुळे गणेश विसर्जन मार्गावरील रस्त्यावर बुजवलेले खड्डे महापालिकेस पुन्हा नव्याने दुरुस्त करावे लागणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...