आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातप्रवण जागांच्या दुरुस्तीला प्राधान्य, जैन इरिगेशनतर्फे शहरात रस्ते दुरुस्ती सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील स्वच्छता अभियानासोबतच महानगरपालिकेशी झालेल्या चर्चेप्रमाणे रस्ते दुरुस्ती अद्यापही सुरूच असून आता रस्त्यांवरील अपघातप्रवण ठिकाणांच्या दुरुस्तीला जैन इरिगेशनने प्राधान्य दिले आहे. गणपती विसर्जनापूर्वीच रस्ते दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. यात विसर्जनापूर्वी दुरुस्ती केलेल्या आणि मध्यंतरी झालेल्या पावसाने पुन्हा खराब झालेल्या रस्त्यांची नव्याने दुरुस्ती करण्यात येत आहे.

गणपती विसर्जनाच्या मार्गावरील इच्छादेवी चौक येथे केलेल्या सिमेंटच्या जोडरस्त्यांमुळे या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीला मोठा दिलासा लाभला आहे. आतापर्यंत नानीबाई अग्रवाल हॉस्पिटल, गिरणाटाकी परिसर, डीएसपी बंगल्यासमोरील टाकी परिसर, स्वातंत्र्य चौक ते पांडे डेअरी, दूध फेडरेशन ते शिवाजीनगर, तांबापुरा रोड, शिरसोली रस्त्यावरील अपघात प्रवण ठिकाणांवर सिमेंट पॅचवर्क, सिमेंट रोड, डब्ल्यू. एम. एम. खडीकरण, मुरूम लेअरची कामे करण्यात आली आहेत. सिमेंट कॉंक्रिट वगळता १४ सप्टेंबरला डब्ल्यू. एम. एम.चे दोन डंपर, १५ ला डब्ल्यू. एम. एम.चे सात डंपर व मुरूम एक डंपर, १६ तारखेला डब्ल्यू. एम. एम.चे पाच डंपर व मुरूम एक डंपर, १७ तारखेला डब्ल्यू. एम. एम.चे व मुरुमाचे प्रत्येकी एक डंपर , १८ तारखेला डब्ल्यू. एम. एम.चे तीन तर मुरुमाचे एक डंपर, १९ तारखेला डब्ल्यू. एम. एम.चे चार डंपर तर मुरुमाचे एक डंपर, आणि २० रोजी डब्ल्यू. एम. एम.चे दोन व मुरुमाचे एक डंपर वापरून दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत.

काम सुरू असलेल्या ठिकाणी आवाहन केल्याप्रमाणे जळगावकरांनीही सहकार्य केले असून महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातील सहकारीही यासाठी मदत करीत आहेत.