आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्छाद : माेकाट कुत्र्यांचा प्रश्न स्थायीच्या सभेत गाजणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात गेल्या काही दिवसांत माेकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अाहे. यासंदर्भात ठाेस भूिमका प्रशासन घेत नसल्याने नागरिक नगरसेवकांकडे संताप व्यक्त करीत अाहेत. त्यामुळे गुरुवारी हाेणाऱ्या स्थायी समिती सभेत यावर जाेरदार चर्चा हाेण्याची शक्यता अाहे.

स्थायी समिती सभापती ज्याेती चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता सभा हाेणार अाहे. यात पालिकेच्या मालकीची १३ वाहने निर्लेखित करून लिलाव करण्यास मान्यता मिळण्यासाठी प्रशासनाच्या प्रस्तावावर निर्णय हाेणार अाहे. या १३ वाहनांमध्ये डाॅग व्हॅनचाही समावेश अाहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून डाॅग व्हॅन बंद असल्याने शहरातील गल्ली-बोळात कुत्र्यांचा विषय गंभीर झाला अाहे. त्यात दीड महिन्यात ७२ जणांना चावा घेतल्याने ही समस्या गंभीर झाली अाहे.
पालिकेने माेकाट कुत्र्यांना अावर घालण्यासाठी ठाेस भूिमका घ्यावी, यासाठी नागरिकांची मागणी वाढत अाहे. तसेच पालिका काहीच करणार नसेल तर नागरिकांनी का मरावे? असा संतप्त सवाल उपस्थित केला जाताेय. याच विषयावरून नगरसेवकांकडे तक्रारींचा सपाटा सुरू झाला अाहे. त्यामुळे पालिकेने काहीही करून कुत्र्यांची समस्या साेडवावी, यासाठी स्थायी समितीत सर्वपक्षीय नगरसेवक प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता अाहे.

‘डाॅग व्हॅन’चा प्रस्ताव धूळखात

अाराेग्याधिकारींनी मार्च २०१५ राेजी डाॅग व्हॅन खरेदीबाबत मंजुरी मिळावी, यासाठी प्रस्ताव दिला हाेता. परंतु, हा प्रस्ताव वाहन विभागाकडे पडून अाहे. त्यावर काेणताही निर्णय घेण्यात अालेला नाही. अाता पुन्हा नव्याने प्रस्ताव दिला जाणार असल्याचे डाॅ.विकास पाटील यांनी सांगितले.

प्रशासन हतबल

डाॅग व्हॅनचा वापर हा माेकाट कुत्रे पकडून त्यांना शहराबाहेर साेडण्यासाठी केला जाताे किंवा कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून पुन्हा पूर्वीच्याच जागी साेडावे लागते. परंतु, काही महिन्यांपूर्वी केंद्रीयमंत्री मनेका गांधी यांनी थेट पालिका अायुक्तांना विचारणा केली हाेती. त्यामुळे अाता माेकाट कुत्रे पकडून ते शहराबाहेरदेखील साेडता येणार नाहीत. तसेच निर्बीजीकरण केले तरी कुत्र्यांची संख्या काही कमी हाेणार नाही, अशी स्थिती अाहे. त्यामुळे प्रशासनदेखील हतबल झाले अाहे.