आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीची छेड; तरुणावर विनयभंगाचा गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - क्लासला जाणार्‍या युवतीची तीन दिवसांपासून पाठलाग करीत छेड काढीत असलेल्या तरुणाने युवतीसोबत तिच्या आईला बघताच पळ काढला. दबा धरून असलेल्या युवतीच्या नातलगांनी या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न करताच, त्याने दुचाकी सोडून पळ काढला. नातलगांनी दुचाकीची मोडतोड करीत संताप व्यक्त केला. गोलाणी मार्केटमधील सुगोकी रेस्टॉरंटसमोर दुपारी 12 वाजता ही घटना घडली. शेख जाकीर नायजोद्दीन (वय 34 मास्टर कॉलनी) असे या युवकाचे नाव आहे. शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.

कालिका माता मंदिर परिसरातील युवती दहावीच्या क्लाससाठी रोज सकाळी 11 वाजता गोलाणी मार्केटमध्ये येत होती. तीन दिवसांपासून तिच्या घरापासून शेख जाकीर हा युवक मोटारसायकलवरून (एमएच-19, जी-8486) मुलीचा पाठलाग करीत होता. तो नियमित पाठलाग करून तुझा मोबाइल नंबर दे व माझ्या गाडीवर बस, असे म्हणून छेड काढत होता. त्याने मुलीच्या सायकलीला जाणीवपूर्वक ठोस मारून सायकलीचे नुकसान केले. मुलीने प्रतिकार केला असताना, मी कुणालाही घाबरत नाही असे सांगत पाठलाग सुरूच ठेवला होता. अखेर त्रस्त झालेल्या मुलगी गुरुवारी आपल्या आई व नातलगांसोबत गोलाणी परिसरात आली. तो दिवसताच मुलीने आईला त्या मुला विषयी सांगितले. बाजूला असलेल्या नातलगांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने वाहन सोडून पळ काढला. त्यानंतर पालकांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

छेडखानीत वाढ
तीन दिवसांपासून शहरात मुलींच्या छेडखानीच्या घटना सातत्याने घडत आहेत. नंदिनीबाई महाविद्यालय, शासकीय विद्यानिकेतन, गोलाणी मार्केट परिसरातील क्लासेस मध्ये मुलींची गर्दी असते अशा ठिकाणी या घटना वाढत आहेत.