आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"मूजे' महाविद्यालयात मुलींची छेड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मूजेमहाविद्यालयातील चार मुलींना दगड मारून, अश्लील भाषेत शिव्या देऊन छेड काढणाऱ्या श्याम तायडे याच्यासह पाच संशयित मुलांवर बुधवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हे पाचही जण तीन दिवसांपासून या मुलींची छेड काढत होते. दरम्यान, महाविद्यालयाकडूनही या प्रकाराची वेळीच दखल घेतली गेल्यामुळे हे युवक बुधवारी पोलिसांच्या हाती लागले नाही.
मूजे महाविद्यालयाच्या कॅण्टीनजवळ तीन दिवसांपासून एसवायबीएस्सीच्या चार मैत्रिणींची छेड काढली जात होती. दरम्यान, बुधवारी सायंकाळी वाजता यातील दोन युवकांनी मुलींना दगड मारला. मुलींनी जाब विचारला असता, त्यांना या मुलांनी शिव्या दिल्या. तसेच अश्लील भाषेत त्यांच्यावर कॉमेंट केले. या प्रकारामुळे मुली घाबरल्या होत्या. त्यातील एका मुलीच्या भावाला माहिती मिळाल्यानंतर त्याने या पाचही मुलांना महाविद्यालयाच्या आवारातच अडवले. हाणामारी होईल तोपर्यंत सुरक्षारक्षकाने मुलांना हटकले. यानंतर हा प्रकार थेट प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी यांच्या दालनात गेला. मात्र, तेथेही पाहिजे तशी दखल घेतली गेली नाही.
आपल्यावर अन्याय झाल्यामुळे या मुलींनी रात्री वाजता रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून त्या टवाळखरोविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
बुधवारी मूजे महाविद्यालयात खुलेआम पाच टवाळखोरांनी चार मुलींची छेड काढली. या प्रकरणात मात्र मुलींनी हिंमत दाखवत आधी प्राचार्य नंतर पोलिसांत तक्रार केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे.
डिसेंबर रोजी अयोध्यानगरात एका वर्षीय मुलीला दुचाकीवरून पळवून नेण्याचा प्रकार घडला. परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही मुलीला सोडवण्यात आले. मात्र, पळवणारा युवक मात्र पसार झाला.
प्राचार्यांच्या दालनातून पलायन
प्राचार्यांच्यादालनात टवाळखोरांना हजर केले होते. प्राचार्य डॉ. चौधरी हे मुलींशी चर्चा करीत असतानाच या मुलांनी दालनातून पलायन केले. ती मुले मूजेची होती की नाही हे सुद्धा कळू शकले नाही, असे डॉ. चौधरी यांनी ‘दिव्य मराठी’ला सांिगतले. रात्री उशिरापर्यंत रामानंदनगर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला.
दगड मारून, अश्लील शिव्या देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल