आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोडरोमिओंचा उच्छाद: खान्देश सेंट्रल परिसरातील प्रकार, मुलींची छेड काढणा-या मवाल्यास बदडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- खान्देश सेंट्रल परिसरात साेमवारी दुपारी वाजता मुलीची छेड काढणाऱ्या समीर शेख या मवाल्याची नागरिकांनी चांगलीच धुलाई केली. या वेळी मात्र त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. समीरला नागरिकांनी शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी पीडित मुलीने पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. दरम्यान, आठवडाभरापासून निर्भया पथकाची कारवाई थंडावली असल्याने मुलींची छेड काढण्याचे प्रकार पुन्हा वाढले अाहे.
शनिपेठ भागातील दोन मुली दुचाकीने खान्देश सेंट्रल येथे जात हाेत्या. तर समीर शेख (रा.भुसावळ) आणि त्याचा मित्र दुचाकीवर या मुलींचा पाठलाग करीत होते. खान्देश सेंट्रलजवळ मोकळ्या जागेत समीर याने त्या दाेघांना अडवून त्यांची छेड काढली. त्यामुळे मुलींनी आरडा-आेरड करण्यास सुरूवात केली. हे पाहून परिसरातील नागरिक धावत अाले त्यांनी समीरला पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. हे पाहून त्याचा मित्र घटनास्थळावरून पळून गेला. समीरची धुलाई केल्यानंतर नागरिकांनी त्याला शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. पोलिस उपनिरीक्षक विजय देशमुख यांनी शेख याला कोठडीत ठेवले असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
दोनतासांनंतर तक्रार : घटनास्थळीसुरू असलेली हाणामारीमुळे घाबरलेल्या मुली घरी निघून गेल्या होत्या. त्यांनी घरी हा प्रकार सांिगतल्यानंतर सायंकाळी वाजता त्या आईसह पोलिस ठाणे अाल्या. त्यांनी समीर याच्याविरुद्ध लेखी तक्रार दिली.
डिसेंबर : अयोध्यानगरातीलसद्गुरूनगर येथील आठ वर्षीय मुलीला घराचा पत्ता विचारण्याचा बहाणा करत पळवून नेण्याचा प्रकार घडला होता. नागरिकांच्या सतर्कतेमुळे तिची सुटका झाली होती.
डिसेंबर: आसोदारोड येथे रस्त्यात मधोमध का उभे राहिले? असा जाब विचारल्याचा राग आल्यामुळे तीन टवाळखोरांनी शहरातील एका शाळेतील शिक्षिकेसोबत गैरवर्तन केले. तर या शिक्षिकेच्या बाजूने बोलण्यासाठी आलेल्या तिघांना बेदम मारहाण केली. यात मारहाण करणाऱ्या तिघांपैकी सुनील सैंदाणे (रा. हिंगोणे, ता. अमळनेर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर त्याचे साथीदार बेपत्ता झाले होते.
१०डिसेंबर : मू.जे. महाविद्यालयातील चार मुलींना दगड मारून, अश्लील भाषेत शिव्या देऊन पाच टवाळखोरांनी छेड काढली होती. यातील संशयित मुलांवर रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
१८डिसेंबर: खान्देशसेंट्रलमध्ये एका कार्यक्रमात जोशीपेठमधील सलमान बागवान या युवकाने मुलीची छेड काढली होती. या प्रकारानंतर जमावाने बागवान याला बदडले होते.
२२डिसेंबर : शाळकरीमुलींची योजनाबद्धरीत्या छेड काढणाऱ्या रिक्षाचालक फरीद रहीम पटेल त्याच्या साथीदारास जमावाने पकडले. यातील पळून गेला तर एकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मुलींची छेड काढणाऱ्या समीर शेख याला पोलिसांच्या स्वाधीन करताना नागरिक.
निर्भया पथकाची मोहीम थंडावली
15 दिवसांपूर्वी मुलींच्या छेडखानीच्या घटनेत वाढ झाली हाेती. याबाबत ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधल्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे हाेत त्यांनी तडकाफडकी निर्भया या विशेष पथकाची नियुक्ती केली होती. या पथकाने धडाकेबाज कामगिरी केल्यामुळे पालकांना दिलासा मिळाला होता. परंतु आता या पथकाची मोहीम थंडावली असून आठवडाभरात चोख कामगिरी दिसत नाही.
खान्देश सेंट्रल परिसरात मवाल्यांचा अड्डा
खान्देशसेंट्रलमध्ये बिग बझार असल्यामुळे याठिकाणी नागरिक, युवक, युवतींचा माेठ्या प्रमाणावर वावर असतो. नेमकी हीच संधी साधून दररोज काही मवाली या परिसरात भटकत असतात. दर आठवड्यात याठिकाणी छेडखानीच्या घटना घडत आहेत. निर्भया पथक महाविद्यालय परिसरात काहीएक कारण नसताना विद्यार्थ्यांवर कारवाई करीत आहे. तर दुसरीकडे या परिसराकडे कानाडाेळा होत अाहे.