आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांझरेच्या रस्त्यांचे सर्वेक्षण; मोठ्या अतिक्रमणांचा अडसर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - पांझरा नदीच्या दाेन्ही काठांवर रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राथमिक सर्वेक्षण केले. त्यात माेठ्या अतिक्रमणांसह दाेन ते तीन ठिकाणी असलेल्या वस्त्यांचा रस्त्यांना अडसर येणार असल्याचे स्पष्ट झाले अाहे. सविस्तर सर्वेक्षणानंतर कारवाई करण्याची भूमिका घेतली जाणार अाहे. दाेन्ही काठांवर रस्ते तयार करण्याची तयारी सुरू झाली अाहे. शहर हद्दीत ११ किलोमीटरचे रस्ते शासनाच्या निधीतून हाेणार आहेत. यात मनपासह जिल्हा प्रशासनाचीही मदत घेण्यात येणार अाहे.
पांझरा नदीच्या काठावर एका बाजूने शिवाजी मार्गावरील रस्ता अाहे. देवपूरकडील दुसऱ्या बाजूने चाैपाटीसाठी अामदार अनिल गाेटे यांनी एक ते दीड किलाेमीटरचा रस्ता तयार केला अाहे. हे रस्ते थेट राष्ट्रीय महामार्गाला जाेडले जातील, अशी याेजना अाखण्यात अाली अाहे. दाेन्ही बाजूने साडेपाच किलाेमीटरचे रस्ते झाले तर शहरातील वाहतुकीवरील भार कमी हाेईल. या रस्त्यांसह वृक्ष एलईडी पथदिव्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छा निधीतून ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला अाहे. त्यासाठी अाता सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाची तयारी सुरू केली अाहे. प्राथमिक सर्वेक्षण झाले असून त्यात रस्त्यांसाठी कशाचा अडसर येईल, याची चाचपणी करण्यात अाली. त्यातून निघालेल्या निष्कर्षानुसार माेठी अतिक्रमणे काही प्रमाणात अाहेत. ती काढावी लागणार अाहेत. त्यातील देवपूरकडील बाजूचा जयहिंदचा जलतरण तलाव माेठा अडथळा ठरणार अाहे. हा तलाव काढला नाही तर रस्त्याचे कामच हाेऊ शकणार नाही. अथवा नदीतूनही रस्ता वळवता येणार नाही. नदीतून रस्ता घेतला तर ताे सरळ पुराच्या रेषेत येईल. त्यामुळे हे एक अतिक्रमण महत्त्वाचे अाहे. दुसरी बाब म्हणजे सिद्धेवर हाॅस्पिटलच्या समाेरील बाजूकडील भागात काही प्रमाणात वस्ती झाली अाहे. त्याचबराेबर कुमारनगर पुलानजीकही वस्ती झाली अाहे. याचाही अडथळा रस्त्यांना येणार असल्याचे दिसून येते.

प्रारंभी झुडपे काढणार
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या प्रस्तावित रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानंतर पुन्हा सखोलपणे सर्वेक्षण करण्यात येणार अाहे. या भागातील काटेरी झुडपे काढण्याचे काम या आठवड्याभरात सुरू होणार आहे.

महत्त्वाचे काम हाेईल
^पांझरानदीच्या दाेन्ही बाजूने हाेणारे रस्ते शहरातील वाहतुकीवरील भार कमी करतील. ही महत्त्वाची बाब त्यातून साधली जाणार अाहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर केला अाहे. कामाची सूचना केली आहे. -अनिलगाेटे, अामदार

पर्यटन स्थळाची आवश्यकता
शहरात नागरिकांना सुटीच्या दिवशी कुटुंबासमवेत फिरण्यास जाण्यासाठी जागा नाही. जे बगिचे आहेत त्यात सुधारणा करण्यात आलेल्या नाही. त्यासाठी एखाद्या चांगल्या पर्यटनस्थळाचा विकास होणे गरजेचे असल्याचे दिसून येते.

नदीपात्रात काटेरी झुडपे वाढली
पांझरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. त्याचप्रमाणे गवताचेही प्रमाण आहे. त्यातून नदीपात्रात घाणीचे प्रमाण वाढलेले आहे. पांझरा नदीवर दोन्ही बाजूला प्रस्तावित रस्त्याचे काम आहे. त्या कामासाठी नदीपात्रातील काटेरी झुडपे काढण्याचे काम लवकरच करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...