आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेफ्टी बिल’ विराेधात इंटक कर्मचा-यांचे धरणे, ‘राेड ट्रान्सपाेर्ट अॅण्ड सेफ्टी बिलामुळे तोटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- केंद्र सरकारने प्रस्तावित रस्ते वाहतूक सुरक्षा कायदा 2014 (राेड ट्रान्सपाेर्ट अॅण्ड सेफ्टी बिल-२०१४) अाणले अाहे. मात्र, त्यात अनेक जाचक अटी असून, या बिलामुळे खासगी वाहतूकदारांना टप्पा वाहतुकीची परवानगी मिळणार अाहे. या िबलाच्या िनषेधार्थ कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स कांॅग्रेस(इंटक)तर्फे बुधवारी िजल्हाधिकारी कार्यालयासमाेर एकदिवसीय धरणे अांदाेलन करण्यात अाले.
राज्य परिवहन महामंडळाच्या वाहक चालकांचा अाॅगस्ट २०१४चा भत्ता िवभागीय कार्यालयाने चुकीचे पत्रक भरल्याने पूर्ण मिळालेला नाही. त्याविराेधात इंटकने शनिवारी घंटानाद अांदाेलन करण्याचे ठरवले हाेते. मात्र, हे अांदाेलन तात्पुरते स्थगित केल्याचे िवभागीय प्रसिद्धीप्रमुख संदीप सूर्यवंशी यांनी पत्रकाद्वारे कळवले.

‘राेड ट्रान्सपाेर्ट अॅण्ड सेफ्टी िबल-२०१४’मधील िवविध कारणांमुळे महामंडळ ताेट्यात येऊन अस्तित्वाचा प्रश्न िनर्माण हाेईल. त्यामुळे या कायद्यातील जाचक अटी रद्द करण्यासंदर्भात बुधवारी राज्यभरातील िजल्हाधिकारी कार्यालयांसमाेर धरणे अांदाेलन केले. इंटकचे िजल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, डी.जी.पाटील, नरेंद्रसिंग जमादार, रवी पाटील, अनिल पाटील, संदीप सूर्यवंशी उपस्थित हाेते.
इंटक कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे अांदाेलन करताना कर्मचारी.
जळगाव अागारातील ३४ चालक अाणि वाहक अाॅगस्ट २०१४मध्ये मुंबई येथे गाैरी गणपतीसाठी बसेस घेऊन गेले हाेते. त्यांनी मुंबई ते काेकण अशा रात्रंिदवस फेऱ्या मारून प्रवाशांची सेवा केली. मात्र, त्यांना त्याबद्दल िमळणारा अाेव्हरटाइम चुकीचे पत्रक भरल्याने अपूर्ण मिळाला. याबाबत संघटनेने संबंिधत अधिकाऱ्यांशी अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाल्याने अांदाेलनाचा पवित्रा घेतल्याचे इंटकचे िवभागीय अध्यक्ष राजपूत यांनी सांगितले. त्यासाठी शनिवारी घंटानाद अांदाेलन केले जाणार हाेते. मात्र, संपूर्ण अाेव्हरटाइम पगारात देण्याचे अाणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे िवभागीय िनयंत्रकांनी लेखी िदल्याने हे अांदाेलन तात्पुरते स्थगित करण्यात अालेे. तथापि, ही रक्कम पगारात िदल्यास तीव्र अांदाेलन करण्याचा इशारा राजपूत यांनी िदला अाहे.