आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवडाभरात मुख्य रस्त्यांवर मुरूम टाकून बुजवणार खड्डे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - सणवारांच्या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डेमय रस्त्यांवर किमान मुरूम टाकला जावा, यासाठी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी आग्रही आहेत. याबाबत त्यांनी मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांना निर्देश दिले अाहेत. मुरुमाची प्रतिब्रास किंमत ठरवून आठवडाभरातच हा विषय मार्गी लागणार अाहे.
शहरातील मामाजी टॉकीज रोड, शिवाजीनगर ते सुंदरनगरपर्यंतचा वरणगाव रस्ता, तापी रोड, आठवडे बाजारातील भाग, मॉर्डन रोडचा काही भाग आदी ठिकाणच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत. पालिकेने १३ मे रोजी झालेल्या बैठकीत खड्डेमय रस्ते बुजवण्यासाठी ठराव केला होता. मात्र, अद्याप उपाययोजना झालेली नाही. मात्र, आठवडाभरात शहरातील सर्व खड्डेमय रस्त्यांवर मुरूम टाकून डागडुजी करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे. याबाबत नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांनी मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांना निर्देश दिले आहेत. मुरूम पुरवठादारांशी संपर्क साधून प्रतिब्रॉसनुसार मुरुमाची खरेदी करावी. तसेच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरातील खड्डेमय रस्ते बुजवावेत. इतकेच नव्हे तर मुरूम टाकल्यानंतर रोलरद्वारे दबाई करून यावर कच टाकण्याचे नियोजनही पालिकेतर्फे करण्यात आले अाहे.

समस्या आता लवकरच निकाली काढू
{नियाेजन सुरू: रणगावरोडवर केवळ खड्ड्यांमुळे आतापर्यंत दोन जणांचे बळी गेले आहेत. यामुळे आता शहरातील सर्वच खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न गंभीर होऊ पाहत आहे. यामुळे पालिकेने खड्डेमय रस्त्यांवर मुरूम टाकणे आवश्यक आहे. पालिकेने हे काम त्वरित हाती घेल्यास जनप्रक्षोभ वाढण्याची भीती आहे. यामुळे पालिका प्रशासनाने आता खड्डेमय रस्त्यांवर मुरूम टाकण्याचे सूक्ष्म नियाेजन सुरू केले अाहे. लवकरच अंमलबजावणी हाेईल.

{प्रमुख रस्ते असे : शिवाजीनगर,पंधराबंगलापासून ते सुंदरनगर हायवेपर्यंतचा वरणगाव रोड, पांडुरंग टॉकीज ते दगडी पुलापर्यंतचे बसवाहतुकीचे दोन्ही मार्ग, टिंबर मार्केटचा भाग, दगडी पूल ते सातारा चौफुलीपर्यंतचा मामाजी टॉकीज रोड, गवळीवाडा ते मटण मार्केटपर्यंतचा मार्ग, आठवडे बाजारातील मुख्य रस्ते, मॉडर्न रोडवरील परिसर, तापीरोड, न्यायालयाच्या मागील भागातील रस्ता आदींवर मुरूम टाकून त्याची दबाई करण्यात येणार अाहे.

{दिलासा मिळणार: गणेशोत्सवसप्टेंबरपासून सुरू हाेणार आहे. या काळात रस्त्यांवर नागरिकांची गर्दी असते तर मिरवणुकीत कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये, म्हणून रस्त्यांची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. यामुळे पालिकेतर्फे खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून ते बुजवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. काही तांत्रिक अडचणी असतील तरी त्यावर मात करून हे काम प्राधान्याने करण्यावर पालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांनी अाता लक्ष केंद्रित केले आहे.

योग्य वापर व्हावा
यापूर्वी मुरुमाचा वापर करून खड्डे बुजवण्यात आले आहेत. मात्र, प्रमाणापेक्षा अधिक वापर केल्यास खड्ड्यांचा आकार पाणी साचल्याने अधिकच वाढला. यामुळे आता मुरुमाचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. पालिका प्रशासनाकडून याबाबतही नियोजन करण्यात आले आहे. मुरूम देखील चांगल्या प्रतीचा वापरला जाणार अाहे.

Ãचार दिवसांपूर्वीच मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. यामुळे पंधरवड्यात यावर प्रत्यक्ष उपाययोजना होणार आहे. एकाचवेळा खड्डे बुजवून किमान पावसाळ्यातील चार महिने त्रास होणार नाही, असे नियोजन केले आहे. अख्तर पिंजारी, नगराध्यक्ष, भुसावळ
बातम्या आणखी आहेत...