आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा नव्या चाैपाट्यांसह फॅशन स्ट्रीट, सहा कि.मी.चे रस्ते मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीच्या साैंदर्यीकरणाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली अाहे. त्यात दाेन्ही बाजूला सहा किलेमीटरचे प्रशस्त रस्त्यांसह सहा नवीन चाैपाट्या तयार केल्या जातील. त्याचबराेबर रस्त्यालगत भाजी मार्केट, हॉकर्स झोन, फॅशन स्ट्रीटही केले जातील. या प्रकल्पासाठी ६५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात अाली अाहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ३० काेटी रुपये मंजूर करण्यात अाले अाहेत, अशी माहिती अामदार अनिल गाेटे यांनी दिली. पांझरा किनाऱ्यावरील रस्ते शहरातील ४२ रस्त्यांशी जोडले जातील. त्यामुळे ५० टक्के वाहतुकीचा भार कमी हाेईल. या प्रकल्पाच्या उद‌्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना अाणणार असल्याचेही गाेटे यांनी सांगितले.
पांझरा नदीवरील साैंदर्यीकरणाच्या प्रकल्पांवर अामदार अनिल गाेटे यांनी साेमवारी विस्तृत माहिती दिली. गुलमाेहाेर विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार गोटे म्हणाले की, शहरात वाहतुकीचे प्रमाण वाढले अाहे. त्या वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी शहरात नवीन रस्ते झाले पाहिजे किंवा रस्त्यावरील अतिक्रमण पूर्णपणे काढले पाहिजे. मात्र ऐंशी फुटी रस्त्यानंतर शहरात नवीन रस्ता झालेला नाही. त्यासाठी शहराच्या मध्य भागातून पांझरा नदी वाहते. त्यामुळे देवपूर पेठ भाग असे दाेन भाग झाले आहेत. तसेच वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातून थेटमहामार्गाला जाेडणारे रस्ते पांझरा नदीच्या दाेन्ही काठावरून तयार केले जातील. या रस्त्यांवर १२०० एलईडी पथदिवे लावले जातील. रस्त्यालगत अतिरिक्त जमिनीचा वापर हॉकर्स झोन, फॅशन स्ट्रीट, चार ते पाच नव्या चौपाट्यांची निर्मिती, उद्याने, भाजी मार्केट, फिश मार्केट यासाठी केला जाईल. त्याचप्रमाणे रस्त्याच्या बाजूला सिंधी, पिंपळ, वड, रेन-ट्री, पारिजातक, शिसव असे साडेसात हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत. प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छा निधीतून ३० कोटी रुपये प्रत्यक्ष मंजूर झाले आहेत. तर उर्वरित रक्कम पुढील आर्थिक वर्षात उपलब्ध होणार आहे. प्रकल्पास मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये नगरविकास विभाग कार्यालयाच्या पत्रान्वये राज्यातील महापालिकांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदानांतर्गत महापालिकेस पांझरा नदीकाठी रस्ते बांधकामासाठी मंजुरी दिली अाहे, असेही गाेटे म्हणाले.
मनपाला केवळ शिक्के मारण्याचे काम
मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये नगरविकास विभागाच्या कार्यालयाला दिलेल्या पत्रात महापालिकांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदानांतर्गत मनपास पांझरा नदीकाठी रस्ते बांधण्यासाठी ३० कोटी मंजूर केले आहेत. मात्र, हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला अाहे. त्यासाठी मनपास केवळ या प्रस्तावावर शिक्के मारण्याचे काम आहे.

पांझरा नदीवर या प्रकल्पांतर्गत गणपती मंदिर ते ब्रिज कम बंधारा यामध्ये कायमस्वरूपी पाण्याचा साठा करून पर्यटनासाठी झुलता पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी साडेचार कोटी प्रकल्पात मंजूर आहेत. त्यातील दोन कोटी प्राप्त झाले आहेत.

पांझरा नदीवर पर्यटनासाठी झुलता पूल
पांझरा नदीवर उभारण्यात येणाऱ्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांचे तयार करण्यात आलेले रेखाचित्र.
हे असेल प्रकल्पात
}पांझरा नदीच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी साडेपाच किलोमीटरप्रमाणे ११ किलोमीटरचे रस्ते.
} कुमारनगर पूल ते ड्रायव्हर्शन ब्रिजपर्यंत दोन्ही रस्ते एका वर्षात बांधून हाेतील पूर्ण.
} नदीच्या दोन्ही बाजूला पूर संरक्षण भिंत.
} नदीच्या दोन्ही बाजूला शहरातील सर्व सांडपाणी वाहून नेण्यासाठी १२०० मिमी पाइप.
} दोन्ही बाजूला रस्ते त्यानंतर पाच फुटांचा फुटपाथ, पाच फुटांमध्ये वृक्ष.
} ६० फूट रस्ता, पुन्हा पाच फूट झाडे, १० फूट जाॅगिंग ट्रॅक अशी हाेईल रस्त्याची आखणी.

पांझरा नदीची पूररेषा निश्चित नाही
पांझरा नदीच्या दोन्ही बाजूला रस्ते, सांडपाणी वाहून नेण्यासाठी पाइप, फुटपाथ केले जातील. त्यासाठी विविध विभागांची आवश्यक परवानगी घेतली अाहे, असे गाेटे यांनी सांगितले. मात्र पांझरा नदीची पूररेषाच निश्चित झालेली नसल्याची माहिती त्यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...