आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यवर्ती भागातील रस्त्यांवरील हाॅकर्सचे फेब्रुवारीला स्थलांतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहराच्या मध्यवर्ती भागातील पाच रस्त्यांवरील हाॅकर्सचे स्थलांतर फेब्रुवारी राेजी करण्यात येणार अाहे. त्यादृष्टीने कागदाेपत्री साेपस्कार पूर्ण करण्यात अाले असून, अायुक्तांच्या स्वाक्षरीनंतर थेट अंमलबजावणी केली हाेणार अाहे. त्यासाठी बंदाेबस्त पुरवावा, असे पत्र पाेलिसांना देण्यात अाले अाहे.
शहरातील चित्रा चाैक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळादरम्यानचे ४० फळ फूलविक्रेते, मनपाच्या सतरामजलीसमाेरील गाेलाणी मार्केटच्या पार्किंगमधील ३० हाॅकर्स, गाेविंदा रिक्षा स्टाॅप ते नेहरू पुतळ्याजवळील २० हाॅकर्स, नेहरू चाैक ते रेल्वे स्टेशनदरम्यानचे १५ हाॅकर्स, बहिणाबाई उद्यानासमाेरील स्वातंत्र्य चाैक ते प्रभात चाैकदरम्यानचे एकूण ५८ हाॅकर्सचे स्थलांतर नियाेजित जागेत केले जाणार अाहे. त्यादृष्टीने महासभेत ठरावदेखील मंजूर करण्यात अाला अाहे. यासंदर्भात उपायुक्त प्रदीप जगताप यांनी टिप्पणी तयार करून अायुक्त संजय कापडणीस यांच्या स्वाक्षरीसाठी सादर केली अाहे. अायुक्तांच्या मान्यतेनंतर फेब्रुवारी राेजी पहिल्या टप्प्यात स्थलांतर केले जाणार अाहे. त्यादृष्टीने मनपाची यंत्रणा सज्ज झाली अाहे.

उपायुक्तांनी पुन्हा दिले अादेश
गेल्या अाठवड्यात बांधकाम अाराेग्य विभागाला अादेश देऊन साफसफाई, दुरुस्ती पट्टे अाखण्याच्या सूचना दिल्या हाेत्या; परंतु या विभागांनी काहीही उपाययाेजना केल्याने उपायुक्त जगताप यांनी पुन्हा अादेश दिले अाहेत. तसेच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी पाेलिसांना पत्र देऊन बंदाेबस्त देण्याची मागणी केली अाहे.