आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीरामपेठ, सुभाष चाैकाच्या रस्त्याने घेतला माेकळा श्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - न्यायालयाचे आदेश अन् पालिकेच्या कारवाईस जुमानता महिनाभरापासून बिनधास्तपणे व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना बुधवारी महापालिकेने मोठा धक्का दिला. बळीरामपेठ सुभाष चौकातील हाॅकर्सविराेधात आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात अाली. आवाहन करूनही दुकाने काढणाऱ्यांचे थेट साहित्य जप्त करण्यात अाले. या वेळी पथकासोबत धक्काबुक्की झटापटी करणाऱ्यांना पोलिसांनी अापला इंगा दाखवला. सकाळपासून सुरू असलेल्या कारवाईमुळे सतत गजबजलेले रस्ते मोकळे पाहायला मिळाले.
गेल्या वर्षभरापासून महापालिकेने रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या हाॅकर्सच्या विरोधात मोहीम सुरू केली अाहे. प्रमुख ११ रस्ते हाॅकर्समुक्त करून वाहतुकीसाठी मोकळे करण्याचे मिशन पालिकेने अाखले अाहे. सहा महिन्यांपूर्वी अतिक्रमण विभागाने सुरू केलेल्या कारवाईला चांगले यश अाले. परंतु गत काळात पालिकेकडून सुरू असलेली कारवाईत राजकीय अडथळे येऊ लागल्याने ब्रेक लागला हाेता. यादरम्यान न्यायालयीन लढाई सुरू हाेऊन त्यात महापालिकेच्या बाजूने निकाल लागला. हाॅकर्सच्या प्रतिनिधींसाेबत चर्चाकरूनही मार्ग निघत नसल्याने अखेर पालिकेचे अायुक्त जीवन सोनवणेंनी पुन्हा धडक मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. यात महापालिकेने जप्त साहित्य परत करण्याचा ठराव केल्याने प्रशासनाची ताकद वाढली. बुधवारी सकाळपासून सुरू झालेल्या कारवाई सत्रामुळे हाॅकर्सची चांगली पंचाईत झाली.

अाधीसूचना नंतर जप्ती
महापालिकेच्याअतिक्रमण अधीक्षक एच.एम. खान त्यांच्या पथकाने सकाळी ९.३० वाजेपासून शिवाजी राेड, बळीरामपेठ सुभाष चाैक परिसरात फिरून हाॅकर्सला दुकाने काढून घेण्याचे आवाहन केले. अन्यथा जप्त करण्याचा इशारा दिला. त्यानंतर अर्धा तास प्रतीक्षा केली. परंतु हाॅकर्सकडून प्रतिसाद मिळाल्याने अखेर सकाळी १० वाजता थेट बळीरामपेठेतील हाॅकर्सचे साहित्य जप्त करण्यास सुरुवात केली. या वेळी काहींनी हातगाड्या लावता भाजीपाला कोपऱ्यावर लावून ठेवला हाेता. परंतु व्यवसाय करण्यास मज्जाव करत सर्व साहित्य माल जप्त करण्यात अाला. पाठोपाठ सुभाष चौकातही जप्तीची मोहीम राबवण्यात अाली.

पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली
गेल्यातीन महिन्यांपासून पोलिस प्रशासन पालिकेला सहकार्य करत नसल्याने हाॅकर्सचा व्यवसाय सुरळीत सुरू हाेता. परंतु अायुक्तांनी पोलिस अधीक्षकांशी केलेल्या चर्चेनंतर पोलिसांचे पथक सकाळपासून तैनात हाेते. विशेष म्हणजे हद्दीचा वाद घालता शहर शनिपेठ पोलिस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्रितरित्या कारवाईत सहभाग नोंदवला. हाॅकर्सचा हाेणारा विरोध माेडीत काढत पालिकेच्या पथकाला पूर्ण सहकार्य केल्याचे सांगण्यात अाले.

हप्तेखाेरीचा अाराेप लागला जिव्हारी
महापालिकेच्याअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांवर हप्तेखाेरीचा अाराेप करण्यात येत हाेता. दाेन चार कर्मचाऱ्यांमुळे सर्व विभाग बदनाम हाेत असल्याने अतिक्रमणाच्या कर्मचाऱ्यांनी हा डाग पुसून काढण्यासाठी कारवाईत दुजाभाव करता कोणालाही माफी केली नसल्याचे सांगण्यात अाले. हप्तेखाेरीचा अाराेप करण्यापेक्षा लाचलुचपत विभागाकडे तक्रार करून रंगेहाथ पकडून द्यावे, असेही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

विरोध, झटापटही झाली
सकाळीपैसे माेजून भाजीपाला अाणलेल्या महिला हाॅकर्सने पालिकेच्या पथकाला माल जप्तीस विरोध केला. पोटापाण्यासाठी व्यवसाय करत अाहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करू, असा प्रश्न करत पथकातील कर्मचाऱ्यांसोबत वादही घातला. परंतु त्यानंतरही हातगाड्या माल जप्त हाेत असल्याने अक्षरक्ष: झटापट केली. परंतु पथकातील कर्मचाऱ्यांनी विरोधाला जुमानता अापली भूमिका पार पाडली. या वेळी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यातही घेतले.

पथकाने ४० पेक्षा जास्त गाड्या केल्या जप्त
पालिकेच्या चार तासांच्या कारवाईत चार ट्रॅक्टर, एक डंपर ६० कर्मचाऱ्यांचा ताफा कार्यरत हाेता. यादरम्यान दोन्ही ठिकाणच्या ४० पेक्षा जास्त हातगाड्या भाजीपाला जप्त करून अायुक्तांच्या बंगल्याच्या परिसरातील गाेडाऊनमध्ये उपसण्यात अाला. या वेळी भाजीपाल्याचा गराडा पाहता ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. कारवाईमुळे घाईघाईत हाॅकर्सने अापला माल टाेपले गल्लीबाेळात लपवून ठेवले हाेते. परंतु पथकाने बारीकसारीक जागांचा शाेध घेत साहित्य जप्त केले. सायंकाळी वाजेनंतर पुन्हा बळीरामपेठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. हाॅकर्स रस्त्यावर उतरल्याने वाहतुकीची काेंडी झाली हाेती. तर सुभाष चाैक रस्त्याला लागून असलेल्या गल्लीबाेळात अनेकांनी दुकाने लावून ग्राहकांची गैरसाेय टाळली.
बातम्या आणखी आहेत...