आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिनिंगमधील दरोडेखोरांची कार सीसीटीव्हीत ‘कैद’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धरणगाव - येथील एस.के.कॉटन जिनिंगमधील दरोड्यात अडीच लाखांची रोकड लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांच्या कारचे छायाचित्र शहरातील दोन ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे पोलिसांना तपासात मोठी मदत होणार असून दरोडेखोर लवकरच गजाआड होण्याची शक्यता वाढली आहे.
सुरक्षारक्षक आणि ग्रेडर यांना हातपाय बांधत तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवण्यात अाला. जिनिंगमधील तिजोरी फोडून दरोडेखोरांनी सोमवारी पहाटे वाजेच्या सुमारास रोकड लंपास केली होती. सुरक्षारक्षक गणेश वाघमारे याने दरोडेखोरांना पांढऱ्या रंगाच्या मारोती-८०० कारमध्ये बसून पळ काढताना बघितले आहे. दरोडेखोर आपसात स्थानिक भाषेत बोलत असल्याने ते स्थानिक असावे, असा अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांनी जिल्ह्यातील काही गँगवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार दोन गँगमधील काही जणांची माहिती काढायला पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यापैकी एका गँगवर पोलिसांचा संशय बळावला आहे.

एलसीबीमार्फतही तपास सुरू
कारचेछायाचित्र पोलिस ठाण्याच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत दिसत अाहे. ही कार पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावरून पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास जाताना दिसत आहे. कार ज्या दिशेने गेली त्या रस्त्याने पोलिसांनी विचारपूस केली असता, ही कार जाताना पाहिली, असे पादचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले; आणखी एका ठिकाणी या कारचे छायाचित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येते. तसेच एलसीबीचे एक पथक मंगळवारी सकाळी धरणगावात तपासाकामी दाखल झाले आहे. कापूस व्यवसायाशी संबंधित जाणकार व्यक्तीच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचाही अंदाज आहे. लवकरच या दरोड्याचा छडा लागेल. लवकरच दरोडेखोरांना गजाआड केले जाईल, असा विश्वास सहायक पोलिस निरीक्षक गणेश कदम यांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...