आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्यानात लपलेल्या दरोडेखोरांना अटक; चारचाकी, टॉमी, मिरचीपूड, कोयता, दोरी जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दरोडा टाकण्यासाठी मेहरूण तलाव परिसरातील शिवाजी उद्यानात लपून बसलेल्या सहा दरोडेखोरांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री २.३० वाजता अटक केली. त्यांच्याकडून एक चारचाकी, टॉमी, मिरची पूड, कोयता, दोरी असे साहित्य जप्त करण्यात आले.

 

शिवाजी उद्यानात मोहम्मद कासीम अब्दुल रज्जाक (वय ४१), मोहम्मद जफर गुलाब नविद कुरेशी (वय २३), मोहम्मद रियाज गुलाब नबी (वय २६), इम्तीयाज अयाज कुरेशी (वय २२), मोहम्मद वसीम मोहम्मद कासीम कुरेशी (वय २०) आणि फय्याज मोहम्मद अय्याज कुरेशी (वय २३, रा.सर्व पाळधी, ता.धरणगाव) हे लपून बसले होते. हे सर्व दरोडेखोर चारचाकी (एमएच १८ एए १७८६) वाहनाने आले होते. याचवेळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रोहन खंडागळे, शिवदास नाईक, शरद भालेराव, सचिन मुंडे, अशरफ शेख, गोविंदा पाटील, समीर तडवी यांचे गस्तीपथक तेथे पोहोचले. त्याना खाक्या दाखवताच दरोडा टाकण्यासाठी आल्याची कबुली दिली. पोलिस नाईक विजय नेरकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. या सर्व संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती सर्वांना दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड. किशोर तडवी यांनी काम पाहिले.

 

रात्रीच्या गस्तीचा झाला फायदा
गेल्या आठवडाभरात शहरात चोरी, घरफोडीचे गुन्हे घडले आहेत. पोलिसांच्या रात्रीच्या गस्त व्यवस्थित होत नसल्यामुळे गुन्हेगारांना चांगलेच फावते आहे. अशात मंगळवारी रात्री एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या चोख गस्तीमुळे दरोडेखोरांना अटक करण्यात यश आले आहे. अन्यथा त्यांनी रात्रीतून दरोडा घातला असता.

 

गुरे चोरण्याचाही संशय
शिवाजी उद्यानाला लागून तांबापुरातील गवळीवाडा परिसर आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. ही टोळी गुरांची चोरीदेखील करीत असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच यापूर्वी त्यांनी भुसावळ तालुक्यात चोरी, घरफोडी, दरोडे टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच त्यांच्याजवळील चारचाकीची चौकशी करीत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...