आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक कोटीचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटला, ग्रामस्थांनी चाैघ अाराेपींना पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दरोडेखोरांच्या टोळीने पिस्तूलचा धाक दाखवून ट्रकचालकाचे अपहरण करून एक कोटी रुपये किमतीचा माल लुटून नेल्याची घटना बुधवारी घडली. वलवाडी (ता.भडगाव) येथील पोलिसपाटलासह ग्रामस्थांनी दरोडेखोरांचा पाठलाग करून त्यातील चाैघांना पकडले. इतर चार फरार झाले अाहेत. सर्व दराेडेखाेर धुळ्यातील अाहेत.

विलास ज्ञानेश्वर भोयर (वय २९, जि.वर्धा) हा ट्रक(सीजी-०४-ई-८५१५)मध्ये एक कोटी रुपये किमतीचे केबल ड्रम, काॅपर कार्टून घेऊन जात होता. बुधवारी पहाटे आठ दरोडेखोरांनी जळगाव दूरदर्शन केंद्राजवळील महामार्गावर स्विफ्ट कारने येऊन भोयर यांची ट्रक अडवली. ट्रक थांबताच टोळीतील पाच दराेडेखाेरांनी ट्रकच्या केबिनमध्ये प्रवेश करून भोयर यांच्यावर पिस्तूल राेखले. त्यानंतर उर्वरित तीन दरोडेखोरांनी ट्रकसह भोयर यांचे अपहरण करून जळगावहून पहूरमार्गे पाचोरा, भडगाव पुढे वडगाव येथे पोहोचले. मात्र, त्याचवेळी दरोडेखोरांची स्विफ्ट कार खराब झाली. या संधीचा फायदा घेत फिर्यादी ट्रकचालकाने दरोडेखोरांच्या तावडीतून निसटून पळ काढला. ट्रकचालक पळत असताना त्याचा दरोडेखोर पाठलाग करीत असल्याचे वलवाडी ग्रामस्थांनी बघितले तेही चालकाच्या मदतीसाठी धावले त्यांनी दरोडेखोरांच्या तावडीतून त्यांची सुटका करीत त्या चौघा दरोडेखोरांनाही पकडले. यानंतर वलवाडीच्या पोलिसपाटलांनी भडगाव पोलिसांना फोन करून बोलावले चौघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. ग्रामस्थांनीपकडलेले आरोपी आबा सुनील भील, (वय ३०), संदीप नामदेव मोरे (वय २५, दाेघे राहणार फागणे, धुळे) इरफान रऊफ पटेल (वय २९), विक्की श्याम गोयर (वय ३०, दाेघे धुळे) या चौघांविरुद्ध जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात दरोडा अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला अाहे.

ग्रामस्थांचे काैतुक
फरारी दरोडेखोर लवकरच पकडू. तसेच मुद्देमाल लवकरच हस्तगत करू. या घटनेत वलवाडी ग्रामस्थांनी जे धैर्य तत्परता दाखवली, ते पोलिसांसाठी दिलासादायक अाहे. -राजेशसिंग चंदेल, पाेलिस निरीक्षक, एलसीबी