आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ: रहिवाशांना वेळीच जाग आल्याने दरोडेखोर पसार, साहित्य विसरले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील न्यू हुडकाे काॅलनी भागात दरोडेखोरांनी एका घराचा कडी कोयंडा तोडल्याची घटना शनिवारी पहाटे २.३० ते वाजेच्या सुमारास घडली. मात्र, घरातील रहिवाशांना जाग आल्याने ते दराेडेखाेरांनी तेथून काढता पाय घेतला. विशेष म्हणून पसार होताना चोरटे आपले साहित्य घटनास्थळी विसरले होते. त्यामुळे चोरट्यांनी शांतता झाल्यावर पुन्हा घटनास्थळ गाठून आपले साहित्य घेऊन पोबारा केला. 
 
न्यू हुडको कॉलनीतील रहिवासी राजेंद्र उपासनी यांच्या घराच्या कडी काेयंडा दरोडेखोरांनी ताेडला. मात्र, उपासनी यांना जाग अाल्याने त्यांनी काॅलनीतील शेजाऱ्यांना मोबाईलवरून घटनेची माहिती दिली. रहिवाशी जागे झाल्याने दराेडेखाेरांना त्या भागातून काढता पाय घ्यावा लागला. 
 
धावपळीत साहित्य विसरले  
न्यू.हुडकाे काॅलनीत अालेले दरोडेखोर सर्व तयारीनिशी अाले हाेते. लाेखंडी टाॅमी, तेल असे साहित्य चोरट्यांनी सोबत आणले होते. तसेच चोरट्यांनी जॅकेट घातल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. परिसरातील नागरिकांना जाग अाल्याने दरोडेखोर पसार झाले. मात्र, घाईगर्दीत टॉमी, तेलाची बाटली असे साहित्य ते घटनास्थळीच विसरले. परिसरातील नागरिकांनी चाेरट्यांचे साहित्य पाहिले, मात्र त्याला काेणीही हात लावला नाही. काही वेळाने नागरिक घरोघरी परल्यावर चोरटे पुन्हा आले. तसेच साहित्य घेऊन त्यांनी पोबारा केला, अशी माहिती अॅड.विनोद तायडे यांनी सांगितले. या घटनेची पोलिसात कोणतिही नोंद नव्हती. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांनी रात्री गस्त सुरू केली आहे. 
 
दिवे सुरू ठेवा : न्यू.हुडकाे काॅलनीतील रहिवाशांनी शनिवारी सकाळी बाजारपेठ पाेलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसरात पाहणी केली. रहिवाशांनी रात्रीच या घटनेची माहिती देणे आवश्यक होते, असे पोलिसांनी सांगितले. तसेच रात्री घराबाहेरील दिवे सुरू ठेवावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी केले. 
 
सतर्कता आवश्यक : शहरातील विस्तारीत भागातील वसाहती नेहमीच चोरट्यांचे लक्ष्य ठरल्या आहेत. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी पुरेशी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. पोलिस प्रशासनानेदेखील शहरातील अंतर्गत भागांप्रमाणेच विस्तारीत भागातही रात्रीची गस्त अधिक सक्तीची करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परिसरात दिवसा फिरणाऱ्या अनोळखींवर नजर ठेवणे, संशयितांच्या हालचाली ओळखणे गरजेचे आहे. 
 
पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेणार 
शहरापासून लांब असलेल्या वसाहतींमधील रहिवाशांनी परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी. तसेच रात्रीची गस्त वाढवण्याच्या दृष्टीने शहरातील पाेलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या जातील. रहिवाशांनीही सतर्कता बाळगावी. 
- नीलाेत्पल, सहायक पाेलिस अधीक्षक 
बातम्या आणखी आहेत...