आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरदिवसा घरफाेडी : लग्नासाठीचे १८ ताेळे साेने लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चैत्रबन काॅलनीत चाेरी करून अस्ताव्यस्त केलेले कपाटातील साहित्य. - Divya Marathi
चैत्रबन काॅलनीत चाेरी करून अस्ताव्यस्त केलेले कपाटातील साहित्य.
जळगाव - गेल्या काही दिवसांपासून शहरातील घरफाेडीच्या घटना कमी झालेल्या असतांना गुरुवारी भर दुपारी चाेरट्यांनी चैत्रबन काॅलनीत राहणार नायब तहसिलदार मिलींद काळकर यांचे फ्लॅटमध्ये भरदिवसा घरफाेडी केली. मुलाच्या लग्नासाठी आणेलेल्या १७.९ ताेळे साेन्याचे दागिन्यांसह सव्वा चार लाखांचा एेवज लंपास केला.

गुरुवारी सकाळी ११.१५ ते दुपारी वाजेच्या दरम्यान चैत्रबन काॅलनीतील गाैरी रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील मध्ये पाचाेरा येथे कार्यरत असलेले नायब तहसीलदार मिलिंद मार्तंड काळकर राहतात. गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे पाचाेरा येथे गेले. महाराष्ट्र बंॅकेत अिधकारी असलेला त्यांचा मुलगा अभिजित हा देखील १० वाजता बंॅकेत गेला. तर पत्नी निलिमा या सकाळी ११.१५ वाजता बाजारात खरेदी करण्यासाठी गेल्या. खरेदी केल्यानंतर त्यांनी बळीराम पेठेतील त्यांच्या भावाकडे जेवण करण्यासाठी थांबल्या.

तरसाेदे यांच्या लक्षात आला प्रकार
शेजारच्या क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये िजल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी शैलेश तरसाेदे राहतात. त्यांचे कुटुंबही गावी गेलेले असल्याने ते दरराेज दुपारी वाजेच्या सुमारास घरी तपास करण्यासाठी येतात. ते गुरुवारी दुपारी आले असता त्यांच्या घराची कडी लावलेली हाेती. मात्र, कुलूप नव्हते. त्यामुळे त्यांना शंका आली. तेव्हा त्यांनी घरात जाऊन बघितले तर घरातील कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकलेली हाेती. मात्र, चाेरट्यांना त्यांच्या घरात काहीच सापडले नाही. त्यानंतर काळकर यांच्या घराचा कडीकाेयंडा ताेडलेला िदसला.

दुपारी २.३० वाजता काळकर यांच्या पत्नी घरी आल्या. त्यांच्या दाेन्ही बेडरूममधील तीन कपाटे ताेडून लाख ६८ हजार रुपये किमतीचे १७.९ ताेळे साेने, ३० हजार रुपयांच्या ७७५ ग्रॅम चांदीचे दागिने, भांडे आणि २१ हजार ५०० रुपये राेख असा एकूण लाख १९ हजार ५०० रुपयांचा एेवज चाेरट्यांनी लांबवल्याचे समाेर आले. या प्रकरणी रामानंद पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा नाेंदवला आहे. या वेळी घटनास्थळाला रामानंदनगर पाेलिस ठाण्याचे िनरीक्षक प्रवीण वाडिले आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलिस निरीक्षक अजय खर्डे यांनी भेट िदली.

एकाही प्रकरणाचा तपास नाही
गेल्या१५ दिवसांत झालेल्या चाेर्‍यांच्या एकाही प्रकरणाचा तपास लावण्यात पाेलिसांना यश आलेले नाही. सध्या लग्नसराई आणि शाळांना सुट्या असल्याने अनेक जण बाहेरगावी जाण्याचे नियाेजन करीत आहेत. मात्र, वाढलेल्या चाेर्‍यांमुळे नागरिकांनी धास्ती घेतली आहे. गुरुवारी झालेली चाेरी रामानंदनगर पाेलिस ठाण्याच्या महाबळ पाेलिस चाैकीपासून हाकेच्या अंतरावर झाली. मात्र, पाेलिस चाैकी अनेक िदवसांपासून बंद असल्याने त्या िठकाणी पाेलिस कर्मचारीच नसतात.

२४ ला मुलाचा साखरपुडा
नायबतहसीलदार काळकर यांचा मुलगा अभिजित याचा २४ मे राेजी अकाेला येथे साखरपुडा आहे. त्यासाठी बनवलेले दागिनेही चाेरट्यांनी लंपास केले. चाेरट्यांनी एका बेडरूमच्या कपाटातून बॅग काढून पलंगावर फेकली. त्या बॅगेतून दागिने लंपास केले. त्या वेळी चाेरट्यांनी चिल्लर, २० आणि १० रुपयांच्या प्रत्येकी नाेटा पलंगावरच फेकून िदल्या हाेत्या.

१५ िदवसांत लांबवला १३ लाख ३८ हजारांचा एेवज
केमिस्ट भवनमध्ये लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडींचा एकूण २६ हजारांचा एेवज चाेरट्यांनी लांबवला हाेता. याप्रकरणी जिल्हापेठ पाेलिसात गुन्हा दाखल आहे. आेंकारेश्वर मंिदरासमाेरून मे राेजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास शरद पन्नालाल जाेशी यांच्या माेटारसायकलच्या िडक्कीतून सहा लाख २५ हजारांचा एेवज लांबवला हाेता. याप्रकरणी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात तक्रार िदली हाेती. प्रेमनगरातील नरेश डुंगशी साेनी यांच्या घरातून मे राेजी भरदिवसा चाेरट्यांनी घरातील कपाटात असलेले दाेन हजार रुपये राेख आणि लाख ९१ हजार रुपयांचे साेने- चांदीचे दागिने चाेरून नेले. तसेच गुरुवारी काळकर यांच्या घरातील लाख १९ हजार ५०० रुपयांचा एेवज, असे १५ िदवसांत एकूण १३ लाख ३० हजार रुपयांचा एेवज चाेरट्यांनी लांबवला आहे.

गाैरीने दाखवला साैरभ टेंट हाऊसपर्यंत माग
गाैरीनावाच्या श्वानाला चाेरट्यांचा माग शाेधण्यासाठी बाेलावण्यात आले हाेते. तरसाेदे यांच्या घराचे कुलूप ताेडून चाेरट्यांनी गच्चीवर फेकून िदले हाेते. त्याचा वास िदल्यानंतर चाेरांचा माग घेण्यास सुरुवात केली. मात्र, माेहननगरच्या रस्त्यावरील साैरभ टेंट हाऊसपर्यंत ितने माग दाखवला. त्यानंतर चाेरटे कदाचित वाहनावर बसून गेले असतील. त्यामुळे पुढील माग समजू शकला नाही. या वेळी पाेलिसांनी धुणीभांडी करणार्‍या महिलांनाही चाैकशीसाठी बाेलावले हाेते.