आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: बंद घर फोडले; दोन मंदिरांमध्येही चोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका घरफोडीसह दोन मंदिरांमध्ये चोरट्यांनी चोरी केल्याच्या तीन घटना शुक्रवारी उघडकीस आल्या आहेत. जयनगरमधील प्लॉट क्रमांक ७२ ‘अ’ मध्ये राहणाऱ्या महावितरणच्या सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता यांच्या गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेल्या घरात चोरट्यांनी घरफोडी करून दीड ते दोन किलो चांदीची भांडी, रोख रक्कम, सोन्याच्या अंगठ्या असा सुमारे दीड लाख रूपयांचा ऐवज लंपास केला. न्यू समर्थ कॉलनीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर अाणि भूषण कॉलनीतील हनुमान मंदिरामध्ये देवांच्या मौल्यवान आभूषणांची चोरी झाली अाहे. 
 
जयनगरमधील महावितरणचे सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता रवींद्र लिलाधर डहाळे हे गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्या नोकरीस असलेल्या मुलाच्या लग्नानिमित्त स्थळ पाहण्यासाठी पुणे येथे गेले हाेते. तेव्हापासून त्यांचे जयनगरमधील घर बंद आहे. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्यांच्या घरच्या वरच्या मजल्यावरील लाइट सुरू असल्याचे या परिसरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या निदर्शनास आले. हा प्रकार तिने शेजाऱ्यांना सांगितला. घराच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीचा काचही फुटलेला होता. शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी डहाळे यांच्याशी संपर्क साधला. 

त्यांना घरातील लाइट सुरू असून खिडकीचा काच फुटल्याबाबत माहिती दिली. तर डहाळे यांनी केवळ देव्हाऱ्यातील लाइट सुरू करून गेल्याचे शेजाऱ्यांना सांगितले. त्यानंतर डहाळे यांनी त्यांच्या भावाला फोन करून खात्री करण्यास सांगितले. डहाळे यांच्या भावाने गुरुवारी रात्री याबाबत खात्री केली असता, घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. घरातील लाइट सुरू असल्याने या घरामध्ये चोरट्यांनी मुक्काम केल्याबाबतही संशय व्यक्त करण्यात येत आहे. 
 
घरातील कपाटासह तिजोरीसह कपाट फोडले : चोरट्यांनीघराच्या वरच्या मजल्यावरील खाेलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील तिजोरी कपाट फोडून घरातील सामान अस्ताव्यस्त फेकले होते. तिजोरीची चावी कपाटात ठेवण्यात आली होती. त्या चावीच्या सहाय्याने चोरट्यांनी तिजोरी उघडून सात ते आठ हजार रूपये, डहाळे यांच्या मुलाच्या लग्नात मिळालेली पूजेची दीड ते दोन किलोची चांदीची भांडी, एक तोळ्याच्या दोन अंगठ्या असा सुमारे सव्वा ते दीड लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तसेच महालक्ष्मीचे मुखवट्यांचा बॉक्सही चोरट्यांनी चोरून नेला आहे. त्याचबराेबर चोरट्यांनी घरातील बॅगा, कॉट तपासल्या तसेच साहित्य देखील अस्ताव्यस्त फेकले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी शुक्रवारी घटनास्थळी अाले; परंतु, घरमालक बाहेर असल्याने त्यांनी पंचनामा केला नाही. घरमालक शुक्रवारी सायंकाळी वाजता पुण्यावरून जळगावला आले. त्यानंतर त्यांनी घर उघडल्यानंतर चोरीमध्ये कोणत्या वस्तू गेल्या याची खात्री केली. 
 
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही चोरी 
आस्वादकॉर्नरजवळील न्यू समर्थनगरातील मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीच्या २० ते २२ हजार रुपये किमतीचा चांदीचा टोप पादुका चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. त्याचप्रमाणे मंदिरातील टेप रेकॉर्डरही चोरून नेला आहे. शुक्रवारी सकाळी वाजता पुजारी शुभम कुळकर्णी मंदिरात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. भर वस्तीत असलेल्या या मंदिरात चाेरट्यांनी चोरी केली. मात्र, दानपेटीला चोरट्यांनी हात लावलेला नाही. ही दानपेटी आषाढी एकादशीला उघडण्यात येते. ही गाेष्ट चोरट्याला माहित असावी. त्यामुळे त्याने दानपेटी फोडली नसावी, असे येथील रहिवाशांनी सांगितले. 
 
भूषणकॉलनी मंदिरातील दानपेटी फाेडली; पैसे, चांदीचे कडे लांबवले 
भूषणकॉलनीतील प्लॉट क्रमांक १०३ मधील मंदिराची दानपेटी गुरूवारी रात्री चोरट्यांनी फोडली. यात त्यांनी पैसे हनुमानाच्या पायातील चांदीचे कडे चोरून नेले. शुक्रवारी सकाळी पुजारी मंदिरात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. भूषण कॉलनीतील प्लॉट क्रमांक १०३ मध्ये हनुमान महादेवाचे मंदिर आहे. हनुमान मंदिरात यापूर्वी दोन वेळा दानपेटी फोडून चोरट्यांनी पैसे लांबविल्याची घटना घडलेल्या आहे. शुक्रवारी दानपेटीतील पैशांसह चोरट्यांनी हनुमानाच्या पायातील चांदीचे कडे चोरून नेले आहेत. या घटनांमुळे मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय मंदिराच्या विश्वस्तांनी घेतला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...