आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमळनेरात चोरट्यांचा ‘दसरा’; एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - शहरातील प्रताप मिलमधील कंपाउंडमध्ये चोरट्यांनी घरफोड्या करुन शनिवारी रात्री दसरा साजरा केला. चोरट्यांनी एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या करुन ४३ हजारांचा माल लंपास केला. 
 
प्रतापनगरातील काही रहिवासी बाहेरगावी गेले होते. त्यांच्या बंद घरांवर लक्ष ठेवून या घरफोड्या झाल्या. चोरट्यांनी धर्मेंद्र बन्सीलाल जैन यांच्या घरातून चार हजार रुपये रोख चांदीचा शिक्का, सुभाष झावरू पाटील यांच्या घरातून १५ हजार रुपये रोख, १५ हजार किमतीचे ग्रॅम सोने आणि चांदीच्या वस्तू असा ३० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. भीमराव यशवंत पाटील यांच्या घरातून चार हजार रोख, २० हजार रुपये किमतीच्या साड्या, अमृत दौलत पाटील यांच्या घरातून पाच हजार रोख, एक ग्रॅम सोने, राजेंद्र शिवाजी मनोरे यांच्या घरातून १५०० रुपयांची अंगठी, चांदीचा ग्लास असा एकूण ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. 

याबाबत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे केला असून नोंद यासंदर्भात नोंद झाली आहे. दरम्यान, सध्या सणासुदीचे दिवस अाहेत. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या कुटुंबीयांचे प्रमाण अधिक आहे. त्यांचे घर रात्री बंद राहत असल्याने अशा ठिकाणी चोरी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पोलिसांनी मनुष्यबळ वाढवून रात्री शहरात गस्त घालावी, अशी मागणी होत आहे. 
बातम्या आणखी आहेत...