आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाचा खून करून दहा लाखांचा एेवज लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - चाळीसगावातील शेतशिवारात सात-आठ सशस्त्र दरोडेखोरांनी गुरुवारी मध्यरात्री धुमाकूळ घालत एका २२ वर्षीय युवकाचा खून करत, त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करत १० लाख ३४ हजारांचा एेवज लुटून नेला. ४५ मिनिटे दरोडेखोरांचा उच्छाद सुरू हाेता.

चाळीसगाव-पाटणादेवी रस्त्यावर कोदगाव फाटा असून तेथून एक किलोमीटर अंतरावर वीटभट्टीचालक कृष्णराव देशमुख यांचे एकमेव घर आहे. गुरुवारी रात्री सात-आठ दरोडेखोर त्या ठिकाणी आले. त्यांनी कृष्णराव यांचा बाहेर झोपलेला मुलगा राहुल (२२) याला उठवून मानेवर घाव घालून जिवे मारले. त्यानंतर दरोडेखोरांनी मोर्चा घराकडे वळवला. साहेबराव देशमुख (८२) यांनी दरवाजा उघडताच त्यांना व त्यांची पत्नी अनसूया (७७) यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या खोलीतील बॉक्सचा कॉट व कपाट रिकामे करून त्यातील एेवज ताब्यात घेतला. त्यानंतर दरोडेखोर शेजारी झोपलेल्या कृष्णराव यांच्या खोलीकडे वळले. त्यांनी तीन वर्षांचा पृथ्वी यास ठार मारण्याची धमकी देत दरवाजा उघडण्यास सांगितले. कृष्णराव देशमुख यांनी दरवाजा उघडला नाही म्हणून दरोडेखोरांनी तोडून आत प्रवेश केला. कृष्णराव यांच्या पोटाला सुरा लावत तिजोरी उघडण्यास भाग पाडले. त्यातून रोकड ताब्यात घेत शेजारील खोली उघडण्यास सांगितले. त्या खोलीत दुसरा मुलगा किरण झोपलेला होता. त्याने दरवाजा उघडला नाही म्हणून वडिलांना ठार मारण्याची धमकी दरोडेखोरांनी दिली. त्यानंतर आराेपींनी याही खोलीचा दरवाजा ताेडून कपाटातील एेवज ताब्यात घेेतला.

हा ऐवज लंपास
आठ लाख रुपये, दीड तोळ्याचा नेकलेस, ८ ग्रॅम वजनाची पोत व सहा ग्रॅम वजनाच्या दोन नथ असे दागिने, तेजश्री देशमुख यांची पोत, २० हजारांचा माेबाईल लंपास करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...