आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगाव शहरात सशस्र दरोडा, दाम्पत्याला जबर मारहाण, महिलेचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव- चोरी करण्याच्या उदेशाने घरात घुसलेल्या चोरट्यांचा प्रतिकार करत असताना डोक्यात लोखंडी रॉड मारुन वृद्धेचा खून करण्यात आला. तसेच तिच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड भागातील आदर्शनगरात गुरूवारी रात्री २ वाजेच्या सुमारास घडली.  

शहरातील कमल सायकल मार्टचे संचालक दगडू कैलास देवरे (वय ६५) व त्यांच्या पत्नी जिजाबाई दगडू देवरे (वय ५५) हे अादर्श नगरात राहतात. त्यांची तीन मुलेही बाजुलाच राहतात. गुरूवारी रात्री चोरटयांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याची कडी काढली. मात्र, यावेळी घरात कुणी तरी प्रवेश करत असल्याचे जिजाबाई दगडू देवरे यांना जाणवले. त्यांनी प्रतिकार केला असता चाेरट्यांनी घरात प्रवेश करत जिजाबाई देवरे यांच्या डोक्यात लाेखंडी राॅड मारला. त्यात त्या जागीच ठार झाल्या. घरातील हा सर्व प्रकार पाहून दगडू दौलत देवरे हे जागे झाले असता चाेरट्यांनी त्यांनाही बेदम मारहाण केली.
 
चोरट्यांनी जिजाबाई देवरे यांच्या अंगावरील ३५ हजार रूपये किमतीची सोने, चांदीचे दागिनेही काढून नेले. चाेरट्यांचा मागोवा घेण्यासाठी घटनास्थळी श्वानपथकही पाचारण करण्यात आले. पथकाने इच्छादेवी मंदिरापर्यंत मार्ग दाखवला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर, अप्पर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, पोलीस उपअधीक्षक अरविंद पाटील, पोलीस उपअधीक्षक केशव पातोंड यांनी भेट देवून माहिती घेतली.
बातम्या आणखी आहेत...