आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळणच्या जिल्हा बँक शाखेवर दराेडा; 8 लाख रुपये लंपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचाेरा - गाळण येथील जिल्हा बँकेच्या शाखेवर रविवारी मध्यरात्री सशस्त्र दराेडा पडला. सात दराेडेखाेरांनी वाॅचमनचे हात-पाय बांधून सात लाख ९२ हजार १८० रुपयांची राेकड घेऊन पलायन केले.

बँकेला रविवारी सुटी असल्याने शाखेला कुलूप होते. मानधनावर असलेले वाॅचमन भीमराव ओंकार शिंदे बँकेच्या बाहेरच झाेपले हाेते. त्याचवेळी ताेंडावर रुमाल बांधलेल्या सात दराेडेखाेरांनी त्यांच्या ताेंडात बाेळा काेंबण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यांना जाग अाल्याने त्यांचे हात-पाय बांधण्यात अाले. त्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बेदम मारहाण करण्यात अाली. त्यानंतर दाेन दराेडेखाेर बाहेर थांबले तर पाच जण बँकेत गेले. गॅस कटरचा वापर करून बँकेची तिजोरी फाेडून त्यांनी लाख ९२ हजार १८० रुपये लंपास केले.

सुरक्षेचे उपाय नाही
बँक शाखेत सुरक्षेचे काेणतेही उपाय नव्हते. सीसीटीव्ही कॅमेरेही नव्हते. याशिवाय अलार्म सिस्टिमही बिघडली हाेती. तसेच वाॅचमनजवळ काेणतेही हत्यार नव्हते. बँकेच्या शाखेत केवळ चार लाख रुपये ठेवण्याचे बंधन असताना येथे लाख ९२ हजार १८० रुपये ठेवण्यात अाले हाेते.

रिक्षाचालकाची सतर्कता : पहाटे पाच वाजेच्या सुमारास बँकेजवळून जाणाऱ्या रिक्षाचालकाचे लक्ष जखमी वॉचमन भीमराव शिंदे यांच्याकडे गेले. ते जाेरजाेरात हुंदका देत असल्याचे त्याच्या लक्षात अाले. रिक्षाचालकाने ही माहिती पोलिसांना दिली.त्यानंतरपाेलिस उपनिरीक्षक अमोल रसाळ, नगरदेवळा पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक प्रकाश पाटील, गणेश मराठे, जिजाबराव पवार हे घटनास्थळी पाेहाेचले. जळगावहून श्वान पथकही मागवण्यात अाले. गौरी या श्वानाने जिल्हा परिषद शाळेकडचा रस्ता दाखवला. घटनास्थळी पाेलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर, अपर पाेलिस अधीक्षक संदीप जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली. शाखा व्यवस्थापक श्यामराव रतन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात अाला. तसेच जखमी वाॅचमन शिंदे यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात अाले.

तीन पथके तपासासाठी रवाना
चाेरट्यांच्या तपासासाठी तीन पथके रवाना करण्यात अाली अाहेत. चाळीसगाव पाचाेरा तालुक्यात जिल्हा बँक शाखेत चाेरीच्या घटना तपासून पाहिल्या जात असून त्या दृष्टीने तपासाची चक्रे फिरवली जात आहेत. जिल्हा बँक शाखांनी सुरक्षेचे उपाय अाखावेत, अशा स्पष्ट सूचना जिल्हा पाेलिस अधीक्षकांनी दिल्या अाहेत. अमाेल रसाळ, पाेलिस उपनिरीक्षक
बातम्या आणखी आहेत...