आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी करताना रंगेहाथ पकडले, रायसोनीनगरात चोरी, धुळे येथून चार चोरट्यांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- द्रौपदीनगरातीलघरात बुधवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास चोरी करीत असताना एका चोरट्याला गस्तीपथकाने रंगेहाथ पकडले. त्या चोराला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

शहरात महिनाभरापासून सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडला आहे. त्यासोबत जबरी चोरी, घरफोडीचे प्रमाणदेखील वाढले आहे. पोलिस प्रशासन नरामाईने घेत असल्याने चोरटे मुजोर झाले आहे.

द्रौपदीनगरातील अशोक कोटे यांच्या घराचा बुधवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास दरवाजा उघडा होता. हे पाहून सराईत गुन्हेगार कैलास चंद्रकांत साबळे घुसला होता. त्या वेळी या भागात पोलिस कर्मचारी अनिल पाटील आणि सुनील दामोदर हे गस्तीवर होते. त्यांनी साबळेला घरात घुसत असताना पकडले. त्याच्यावर अगोदर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. साबळेला पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान, कोटे यांच्या घरातून १५ दिवसांपूर्वी मोबाइल चोरीला गेला होता.

जळगाव रायसोनीनगरातीलगट क्रमांक ४६० मध्ये राहणाऱ्या जयश्री सूर्यवंशी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना बुधवारी रात्री वाजता उघडकीस आली. सूर्यवंशी ह्या तीन दिवसांपासून कुटुंबीयांसह बाहेरगावी गेलेल्या आहेत. बुधवारी रात्री त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्यांना चोरी केल्याची घटना लक्षात आली. चोरट्यांनी दरवाज्याची कडी कटरच्या साह्याने कापून कुलूप बाजूला फेकलेले होते.तसेच कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकला होता. घटनेविषयी नागरिकांनी रामानंदनगर पोलिसांना माहिती िदली. पाेिलसांनी सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन लागला नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना चोरीबाबत माहिती दिली.

जळगाव- शहरातधुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस प्रशासन कामाला लागले आहे. बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे येथून चौघा अट्टल चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी धुळे, चाळीसगाव, औरंगाबाद येथे अनेक सोनसाखळ्या, दोन दरोडे, जबरी चोऱ्या, मोटारसायकलींची चोरी केल्याची कबुली दिली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुधवारी चोरट्यांचा तपास करण्यासाठी धुळे येथे गेले होते. तेथून त्यांनी चार अट्टल चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. या चौघांनी धुळे, चाळीसगाव, औरंगाबाद येथे अनेक सोनसाखळ्या, दोन ठिकाणी दरोडे, जबरी चोऱ्या आणि मोटारसायकलींची चोरी केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरट्यांकडून चाळीसगाव येथे चोरलेल्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. तसेच दिल्ली येथे एलसीबीचे एक पथक बिमला सूरज या महिलेला घेऊन गेले आहे. तेथे त्यांना दोन्ही चोरांशिवाय इतर आणखी चोरट्यांची माहिती मिळाली आहे.