जळगाव- अादर्शनगरात घराला अचानक आग लागून दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८.३० ते वाजेच्या सुमारास घडली.
आदर्शनगरात भानुदास वाणी यांचे तीन खोल्यांचे घर आहे. आग लागली तेंव्हा घरात कुणीही नव्हते. वाणी हे दरवाजा ओढून शेजारीच असलेल्या इस्त्रीच्या दुकानावर गेले होते. अचानक घरातून धूर बाहेर येऊ लागल्यानंतर नागरिकांसह वाणी यांनी घराकडे धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुमारे २० मिनिटांत महापालिकेच्या अग्निशामक विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. आगीत दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आगीत जळालेला एसी.