आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपावसात उंबरठ्याची पूजा करून घरफोडी, जळगावमधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दरवाजाचे लॅच लॉक टॅमीने तोडताना चोरटा. - Divya Marathi
दरवाजाचे लॅच लॉक टॅमीने तोडताना चोरटा.
जळगाव- शहरात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसात रेनकोट घालून चोरट्यांनी उंबरठ्याची पूजा करून निवृत्तीनगरातील प्लाॅट क्रमांक ४मध्ये रात्री ते २.३८ वाजेच्या दरम्यान घरफोडी केली. यात त्यांनी लाख ५५ हजारांचा एेवज लंपास केला. हे चारही चाेरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले अाहेत. याप्रकरणी पाेलिसांनी चार संशयितांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, दहा वर्षांपूर्वीही याच घरात चाेरी झाली हाेती. महामार्गाच्या लगत गेल्या पंधरा दिवसांतील ही तिसरी चाेरी अाहे.

निवृत्तीनगरातील प्लाॅट क्रमांक ४मधील ‘मन’ बंगला धरणगाव येथील पी.अार.महाविद्यालयाचे प्रा.सुरेश रमेश अत्तरदे यांच्या मालकीचा अाहे. त्यांची मुलगी यंदा १२वी उत्तीर्ण झाल्याने ते तिच्या अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी ३१ जुलै राेजी रात्री पुणे येथे गेल्याने घर बंद हाेते. {उर्वरित. पान
रेनकाेट घालून अाले चाेरटे
चाेरी करण्यासाठी अालेल्या चारही चाेरट्यांनी रेनकाेट घातलेले हाेते. यातील तीन चाेरट्यांनी टाेप्या घातलेल्या हाेत्या. तसेच सर्व चाेरट्यांनी ताेंडावर रुमाल बांधलेला हाेता, तर हातात हातमाेजे घातलेले हाेते.

चाेरट्यांनी पुजली अमावास्या
अमावास्येच्यादिवशी चाेरी करणे शुभ असल्याची चाेरट्यांची अंधश्रद्धा अाहे. त्यामुळे अमावास्येच्या दिवशी अनेक चाेरटे चाेऱ्या करतात. निवृत्तीनगरात चाेरी करताना चाेरट्यांनी मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर ११ रुपये ठेवून पूजा केली हाेती. तसेच चाेरट्यांनी लाॅकरमधील मंगलपाेतही तशीच ठेवली.
पुढील स्लाइड्सवर, पाहा, Photos
बातम्या आणखी आहेत...