आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, जळगाव जिल्ह्यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- देविदास नगरातील एका शिक्षिकेच्या घरात गुरुवारी मध्यरात्री चाेरी झाली. या चाेरट्यांनी दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला अाहे. विशेष म्हणजे हे शिक्षक दांपत्य ज्या खाेलीत झाेपले हाेते त्या ठिकाणी चाेरट्यांनी अगदी सावधपणे चाेरी केली. घरफाेडीच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी शहरात माेहीम राबवली अाहे, तरीदेखील घरफाेडी, चाेरीच्या घटना थांबलेल्या नाहीत.

देविदासनगरात अरुण बोरोले त्यांच्या पत्नी अध्यापिका महाविद्यालयातील शिक्षिका माधुरी हे राहतात. गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत गप्पा मारल्यानंतर हे दांपत्य झाेपले. रात्री १२ वाजेनंतर चोरट्यांनी घराच्या लोखंडी गेटची कडी उघडून दांपत्य झाेपलेल्या ‌खाेलीत प्रवेश केला. या ठिकाणातील त्यांनी दांपत्य गाढ झाेपेत असल्याचा फायदा घेऊन कपाटातून साडेतीन तोळे सोने, १५ हजार रुपये रोख चांदीच्या देवाच्या मूर्ती, मोबाइल असा एकूण लाख रुपयांचा ऐवज चाेरून नेला. शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता बोरोले दांपत्य पाणी भरण्यासाठी उठल्यानंतर त्यांना चाेरी झाल्याचे कळले. त्यामुळे त्यांनी कपाटातील दागिन्यांच्या पेटीचा शाेध घेतला त्या वेळी त्यांना घराच्या कंपाउंडजवळ तर रस्त्यावर काही कपडे फेकलेले दिसले. माधुरी बोरोले यांनी शेजारी राहणाऱ्या सेवानिवृत्त पोलिस झाल्टे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कळवले. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी अरुण बोरोले यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

बोरोले आजारी
बाेराेलेदांपत्याच्या दाेन्ही मुलींचे लग्न झाल्याने घरात ते दाेघेच असतात. माधवी या शिक्षिका असल्याने त्या दिवसभर घराबाहेर असतात तर अरुण बोरोले हे अनेक वर्षांपासून अाजारी असल्याने ते घरीच राहतात. गुरुवारी अरुण बाेराेले यांनी औषध घेतल्यानंतर गाढ झाेपले हाेते. नेमकी ही संधी साधून चाेरट्यांनी चाेरी केली.

देवाची मूर्ती, मृतकाचे सोनेही गेले
माधुरीबोरोले यांच्या मृत झालेल्या बहिणीच्या मंगळसूत्रामधील एक सोन्याचा मणी माधुरी यांच्या पर्समध्ये होता. ताे मणीदेखील चोरट्यांनी चोरून नेला आहे. या शिवाय कपाटातील देवांच्या दोन चांदीच्या मूर्तीदेखील चोरट्यांनी लंपास केल्या.
बातम्या आणखी आहेत...