आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किनगाव स्टेट बँकेवर \'धूमस्टाईल\' दरोडा; पाच लाख लांबविले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- तालुक्यातील किनगाव येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेवर शुक्रवारी सकाळी अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर पाच लाखांची रक्कम लुटून नेली. किनगावात भरदिवसा स्टेट बॅंकेवर दरोडा टाकण्यात आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. शुक्रवारी सकाळी साडे दहा बाजेच्या सुमारास ही घटना घडली.

तीन अज्ञान दरोडेखोर विना नंबरच्या काळ्या रंगाच्या पल्सरवरुन आले होते. मुख्य बाजारपेठेत असलेल्या स्टेट बँक शाखेत शिरले. एकाने सर्वात आधी कॅश ऑफिसर डी.बी.कुलकर्णी यांच्या डोक्यावर बंदुक लावली. यानंतर त्यातील एकाने सरळ कॅशिअर रुममध्ये प्रवेश करत कॅशिअर रमजान तडवी यांच्या पाठीवर बंदुक लावत सोबत आणलेल्या हिरव्या रंगाच्या पिशवीमध्ये रोकड टाकण्याचे सांगितले. त्याच्या दोन इतर साथीदारांपैकी एकाने गेट बंद करीत बंदुक धरुन तिथे उभा राहत बाहेर लक्ष ठेवू लागला. तिसर्‍याने देखील बंदुक काढत बँकेतील कर्मचारी व ग्राहकांना शांत बसण्यास सांगितले व त्या सर्वांना मागच्या खोलीत नेवून बंद केले. पाच लाखांची रोकड पिशवीत टाकून तिघे दोनगाव- डांभुर्णीच्या मार्गाने पसार झाले आहे.

घटनेची माहीती मिळताच पोलिस नि‍रीक्षक नागेश जाधव घटनास्थळी पोहचल असून परीसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख डी.डी.गवारे यांनी देखील आरोपींच्या शोधासाठी पथक तयार करुन आरोपींच्या मागावर पाठविले आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे बँक कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.