आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षिकेच्या घरात चाेरी; आठ ताेळे साेने लांबवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हाधिकारी निवास परिसरातील श्रद्धा काॅलनीत साेमवारी रात्री ते गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान शिक्षिकेच्या घरात चाेरी झाली अाहे. यात चाेरट्यांनी घराचे कुलूप ताेडून साडेसात ताेळे साेन्यासह एक लाख ३० हजार ९५० रुपयांचा एेवज लंपास केला अाहे. याप्रकरणी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला अाहे.

खेडी येथील उत्कर्ष विद्यालयातील शिक्षिका सविता अशाेक भावसार (वय ५४) ह्या श्रद्धा काॅलनीतील प्लाॅट नंबर मध्ये राहतात. साेमवारी रात्री भावसार त्यांचा मुलगा हिमांशू याच्यासह उपचारासाठी पुणे येथे गेल्या हाेत्या. गुरुवारी परत अाल्यानंतर त्यांना घराचा कडीकाेयंडा तुटलेला दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहिल्यानंतर त्यांना साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. चाेरट्यांनी कपाट फाेडून लाेखंडी पेटी बाहेर काढली होती. त्यातून त्यांनी तीन साेनसाखळ्या, एक अंगठी, दोन नेकलेस, एक पाटली असे साडेसात ताेळे साेन्याचे दागिने तर चांदीचा तांब्या, फुलपात्र, दोन निरांजन, संध्यापात्र, लामणदिवा, संध्यापळी, असे ५०० ग्रॅम चांदीचे भांडे, राेख दाेन हजार रुपये चाेरट्यांनी लंपास केले अाहे.

माेटारसायकलही चाेरली
भावसारयांच्या घराजवळून काही अंतरावर असलेल्या एका अपार्टमेंटमध्येही गुरुवारी चाेरट्यांनी माेटारसायकल लंपास केली अाहे. मात्र, याप्रकरणी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात नाेंद झालेली नव्हती. चोरट्यांनी याच गाडीवरून पाेबारा केल्याचा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला अाहे.
तीन संशयित पाहिले
भावसार यांच्या घराजवळून गुरुवारी पहाटे वाजेच्या सुमारास काळे कपडे घातलेले ताेंडाला रुमाल बांधलेले तिघे जात असताना समाेर राहणाऱ्या विजया नागणे यांनी बघितले. त्यापैकी एकाच्या हातात पिशवी तर एकाच्या पाठीवर सॅक हाेती. काही अंतरावर चालत गेल्यानंतर माेटारसायकलवर बसून ते पसार झाले.