आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोड्यांपाठोपाठ अवतरले ‘प्लेयर्स’, धावत्या ट्रकमधून चोरला सव्वातीन लाखांचा माल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६... वेळ बुधवारी पहाटे वाजेची... जळगावकडून भुसावळच्या दिशेने कापडाचा ट्रक जात होता... मागून तीन-चार चोरटे गाडीवर चढले... ताडपत्री फाडून त्यांनी ट्रकमधील कापडाच्या गाठी मागे फेकल्या... मागून त्यांच्या साथीदारांची पिकअप व्हॅन येत होती... व्हॅनमधील साथीदार फेकलेल्या कापडाच्या गाठी उचलत होते... काही मिनिटांतच या ‘प्लेयर्स’नी धावत्या ट्रकमधून सव्वातीन लाखांचे कापड लंपास केले... बॉलीवूडमधील अभिषेक बच्चन बिपाशा बसू यांचा थरारपट ‘प्लेयर्स’च्या कथेला साजेशी घटना जळगावात घडली.
गेल्या तीन दिवसांपासून शहरात चोऱ्या घरफोड्यांचे प्रकार सुरू असून, चोरट्यांच्या नवनवीन तंत्रासमोर पोलिस यंत्रणा हतबल ठरली असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी पहाटे वाजता सुरत येथून कापडाच्या गाठी घेऊन एक ट्रक (क्र.एमएच-३१-सीबी-५७९५) महामार्गावरून नागपूरकडे जात होता. नशिराबाद टाेलनाक्याच्या अलीकडे ट्रकचा वेग मंदावल्यानंतर मागील बाजूने तीन-चार चोरटे ट्रकवर चढले. त्यांनी वरील ताडपत्री फाडून ट्रकमधील कापडाच्या गाठी मागे फेकण्यास सुरुवात केली. मागे त्यांच्या साथीदारांची पिकअप व्हॅन येत होती. ते फेकलेल्या गाठी उचलत होते. काही वेळानंतर मागून एक एसटी बस आली. बसचालकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्याने लाइट देऊन इशारा केला. हा प्रकार चोरट्यांच्याही लक्षात आला. ट्रकचा वेग कमी होताच ते उतरले आणि पुन्हा पिकअप व्हॅनमध्ये बसून जळगावच्या दिशेने गायब झाले. त्या वेळी चालक देवाजी शेंडे याने ट्रक नशिराबाद येथील पेट्रोलपंपावर लावला. त्यानंतर त्याने नागपूर येथील मालक मोहन वाघईडे यांना हा प्रकार कळवला. या प्रकरणी एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धावता-धावता १६ गाठी लंपास
याट्रकमध्ये सुरत येथून कापडाच्या १३२ गाठी नागपूरला घेऊन जाण्यासाठी भरल्या होत्या. त्यांची किंमत ३४ लाख रुपये होती. त्यापैकी चोरट्यांनी १६ गाठी लंपास केल्या. त्या सव्वातीन लाख रुपये किंमतीच्या होत्या.
अधिक्षकांकडून चौक्यांची तपासणी
शहरातीलवाढत्या चोऱ्या लक्षात घेता पो‍लिस अधीक्षक डॉ. सुपेकर यांनी बुधवारी रामानंद पो‍लिस स्टेशन हद्दीतील महाबळ, रामानंद पिंप्राळा चौकीची पाहणी केली. या वेळी एलसीबीचे पो‍लिस निरीक्षक अशोक सादरे सोबत होते.

ट्रकमधून कापडाच्या गाठी काढून मागे धावत असलेल्या पिकअप व्हॅनमध्ये टाकल्या