आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भरदिवसा 3 लाखांची घरफोडी, गणेश कॉलनीतील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वसुबारसच्या रुपाने सोमवारपासून दीपोत्सवाला सुरुवात झाली. बाजारात खरेदी-विक्रीची लगबग सुरू असतानाच गणेश कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी झाली. यात चोरट्यांनी सुमारे लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. दीपोत्सवाच्या पहिल्याच दिवशी चोरट्यांनी पोलिसांना सलामी दिली आहे. 
 
गणेश कॉलनीतील सुखकर्ता अपार्टमेंटच्या बी विंगच्या तळमजल्यावर संजय देवेंद्र वढावकर हे पत्नी अनिता यांच्यासह राहतात. वढावकर दांपत्य खासगी कंपनीत नोकरीस आहेत. सोमवारी सकाळी ८.३० वाजता वढावकर, तर १०.३० वाजता त्यांच्या पत्नी ड्युटीच्या निमित्ताने कुलूप लावून घराबाहेर पडल्या. त्यांच्या घराला लाकडी दरवाजासह लोखंडी गेटदेखील आहे; परंतु सोमवारी त्यांनी लोखंडी गेटला कुलूप लावलेले नव्हते. दुपारी ४.३० वाजता संजय वढावकर हे घरी आले. या वेळी दरवाजा उघडाच होता. त्यांनी घरात शिरून पत्नीला आवाज दिला; परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानी किचन, हॉलमध्ये पाहिले त्यानंतर बेडरूममध्ये गेले असता त्यांना कबर्ड खुले त्यातील सामान अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. चोरट्यांनी कटरच्या साह्याने घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश केला होता. त्यानंतर स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने कबर्डचे ड्रॉवर उघडून सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे रोख रक्कम असा सुमारे लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे आढळून आले. वढावकर यांनी पत्नीस फोन करून माहिती दिली. त्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून माहिती दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
खरेदीमुळे अपार्टमेंटमध्ये शुकशुकाट 
सोमवारीअपार्टमेंटमधील बहुतांश कुटुंबीय बाजारात खरेदीसाठी गेले होते. त्यामुळे परिसरात शुकशुकाट होता. चोरट्यांनी नेमकी हीच संधी साधून हातसफाई केली. जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासणी केली आहे. पोलिसांनी दरवाजा तसेच कबर्डवरील चोरट्यांच्या हातांचे ठसे तपासले आहेत. तसेच अपार्टमेंट बाहेरील दुकानदारांकडून माहिती घेतली आहे. या अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही. 
 
हा ऐवज गेला चोरीस 
वढावकरयांच्या घरातून साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १२ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ग्रॅम वजनाचे कानातले. १५ हजार रुपये रोख तसेच दोन चांदीच्या वाट्या ग्लास असा ऐवज चोरीस गेला आहे. सुमारे लाख रुपये किमतीचा हा ऐवज आहे. 
बातम्या आणखी आहेत...