आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात पुन्हा धावत्या रिक्षातून लांबवला एक लाखाचा एेवज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नेहरू पुतळ्यापासून रिक्षात बसलेल्या महिलेच्या पर्समधून दाेन महिलांनी २९ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता लाख हजार ८०० रुपयांचा एेवज लंपास केला हाेता. याप्रकरणी रविवारी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. रिक्षातून एेवज लंपास झाल्याची पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना अाहे.

पिंप्राळा परिसरातील द्राैपदीनगरातील करुणा सुधीर पटवारी (वय ५३) या २९ फेब्रुवारीला दागिने स्टेट बंॅकेतील लाॅकरमध्ये ठेवण्यासाठी अाणि बाजार करण्यासाठी शहरात अाल्या हाेत्या. मात्र, बंॅकेत लाॅकर काउंटरवर काेणीही हजर नसल्याने त्या बाजारात खरेदीसाठी गेल्या. गाेलाणी मार्केटमध्ये खरेदी केल्यानंतर त्या दुपारी १२ वाजता नेहरू पुतळ्याजवळून एका रिक्षात बसल्या. त्या रिक्षात अगाेदरच एक पुरुष, एक महिला अाणि एक लहान मुलगा असे तिघे बसलेले हाेते. त्यानंतर गाेविंदा रिक्षा थांब्याजवळ अाणखी एक महिला रिक्षात बसली. अगाेदर बसलेल्या महिलेला ती अाेळखत हाेती. रिक्षा नवीन बसस्थानकाजवळ अाली तेव्हा पटवारी यांनी रिक्षाचे भाडे देण्यासाठी माेठ्या पर्समधून लहान पर्स बाहेर काढली त्यातून ५० रुपये काढले. त्या वेळी दागिने अाणि राेख रक्कम माेठ्या पर्समध्ये हाेती. त्यानंतर मानराज पार्कजवळ रिक्षाचे भाडे देऊन त्या खाली उतरल्या. त्या वेळी रिक्षाचालकाने उरलेले पैसे पटवारी यांना परत िदले. नंतर रिक्षा खाेटेनगरकडे निघून गेली. उरलेले पैसे पर्समध्ये ठेवण्यासाठी पटवारी यांनी लहान पर्स शाेधली. मात्र, पर्स गायब हाेती. त्या पर्समध्ये १९ हजार रुपये राेख, ८९ हजार रुपयांचे दागिने अाणि ८०० रुपयांचा माेबाइल हाेता. रिक्षात बसलेल्या महिलांनीच हा एेवज चाेरल्याचा पटवारी यांना संशय अाहे. याप्रकरणी रविवारी रामानंदनगर पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

दोन्ही चोऱ्यांची पद्धत सारखीच
शहरातरिक्षांमध्ये एकाच पद्धतीने एकाच रस्त्यावर पंधरा दिवसांत दाेन चाेऱ्या हाेतात. चाेरट्यांची चाेरी करण्याची एमअाेबी सारखीच अाहे. गेल्या १५ दिवसात चोरट्यांनी धावत्या रिक्षातून दोन घटनांमध्ये सुमारे सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. मात्र, पाेलिस या प्रकरणातील एकाही अाराेपीपर्यंत पाेहाेचू शकलेले नसल्याने याबाबत अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे.

२३ फेब्रुवारीलाही झाली हाेती चाेरी
गांधीनगर(गुजरात) येथील प्रीती राजेश चाैधरी या २३ फेब्रुवारीला स्टेट बँक कॉलनीत मामाच्या मुलीच्या लग्नासाठी अाल्या हाेत्या. त्या वेळीही नेहरू पुतळा चाैकातून पाच महिला रिक्षात बसल्या. त्यांनी चाैधरी यांना बाेलण्यात गुंतवून त्यांची लाख १५ हजार रुपये िकमतीचे अाठ ताेळे साेन्याचे दागिने असलेली पेटी लंपास करून त्या नवीन बसस्थानकाजवळ उतरल्या हाेत्या. याप्रकरणीही िजल्हापेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल अाहे.