आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅबिनेट मंत्री खडसेंच्या बंगल्याशेजारी तीन घरफोड्या, जळगावकर धास्तावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवरामनगरातील अपार्टमेंटमध्ये चौकशी करताना पोलिस अधिकारी. - Divya Marathi
शिवरामनगरातील अपार्टमेंटमध्ये चौकशी करताना पोलिस अधिकारी.
जळगाव - शहरातील शिवरामनगरातील पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या बंगल्याशेजारी असलेल्या दाेन अपार्टमेंटमधील तीन फ्लॅट सत्यवल्लभनगरातील एका फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांच्या हाती काहीच लागल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. शहरातील चोरटे माेडसअापरेंडी बदलून चाेऱ्या करीत अाहेत. कधी रात्री, कधी पहाटे, तर दिवसाही चाेऱ्या हाेत असल्याने शहरवासीय धास्तावले अाहेत.

शुक्रवारी चोरट्यांनी पालकमंत्री खडसे यांचा बंगला असलेल्या शिवरामनगरातील श्रुती अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील कन्नर अय्यर यांच्या फ्लॅट क्रमांक ५च्या कडीकाेयंडा ताेडून चोरट्यांनी प्रवेश केला. त्या वेळी अय्यर त्याच अपार्टमेंटमधील दुसऱ्या फ्लॅटमध्ये झाेपण्यासाठी गेले हाेते. मात्र, त्यांच्या फ्लॅटमध्ये काहीच नसल्याने चोरट्यांना िरकाम्या हाती परतावे लागले. तसेच त्याच अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर वनीता माेटवाणी अाणि सरला खट्टर यांच्या फ्लॅट क्रमांक १०चासुद्धा चोरट्यांनी कडीकाेयंडा ताेडला. मात्र, या फ्लॅटमध्ये गेल्या वर्षभरापासून काेणीच राहत नसल्याने या िठकाणाहूनसुद्धा चोरट्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. त्यानंतर चोरट्यांनी समाेरच्या वासंती अपार्टमेंटकडे माेर्चा वळवला. या अपार्टमेंटमधील सुमीतचंद टाटिया यांच्या मालकीच्या फ्लॅट क्रमांक २चे लाॅक ताेडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र, लॅच लॉक असल्याने चोरट्यांचा हा प्रयत्नसुद्धा फसला. त्यानंतर चोरट्यांनी सत्यवल्लभनगरातील साई हाइट्स या अपार्टमेंटच्या ५व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक गाठले. हा फ्लॅट निवृत्त मुख्याध्यापक रमेश भंगाळे यांच्या मालकीचा असून ते बाहेर गावी गेले अाहेत. त्यांच्याही फ्लॅटचा कडीकाेयंडा चोरट्यांनी तोडला. मात्र, लाेखंडी दरवाजाचे सेंटर लॅच लाॅक तुटले नाही. त्यामुळे चोरट्यांना या फ्लॅटमधूनही हात हलवत जावे लागले.

तिन्ही अपार्टमेंटमध्ये वॉचमन
श्रुतीअपार्टमेंटमध्ये वॉचमन तुकाराम रोहिमारे, वासंती अपार्टमेंटमध्ये राजेंद्र पाटील हे दोघे चोरी झाली, तेव्हा झोपलेले होते; तर साई हाइट्समध्ये शांतिलाल तंवर हा वॉचमन आहे. मात्र तो शुक्रवारी गावाला गेला हाेता. त्यामुळे वॉचमन नसल्याने चोऱ्या होतात, असे म्हटले जाते. मात्र, शुक्रवारी चोरीचे प्रयत्न झालेल्या तिन्ही अपार्टमेंटमधे वॉचमन होते.
बातम्या आणखी आहेत...