आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठ्यातच बहरले होते रॉबर्ट गीलचे प्रेम - मधू चौधरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - इंग्रज सैन्यातील मेजर रॉबर्ट गील हे कलासक्त व्यक्तिमत्त्व होते. ईस्ट इंडिया कंपनीचे क्वॉलिफाइड आर्टिस्ट असल्यामुळे निवृत्तीनंतर त्यांची अजिंठ्याची प्रतिकृती निर्माण करण्यासाठी नियुक्ती झाली होती. चित्रकृती साकारताना अजिंठ्याच्या डोंगररांगांमध्ये त्यांचे व पारूचे प्रेम बहरले होते, असे येथील अभ्यासक मधू चौधरी यांनी सांगितले.

अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सोमवारी म्युनिसिपल हायस्कूलमध्ये आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’ या विषयावर त्यांनी विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, रॉबर्ट गील यांनी अजिंठा येथे आपल्या कुंचल्यातून 170 प्रतिकृती तयार केल्या होत्या. यानंतर त्यांना इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाने ईस्ट इंडिया कंपनीतर्फे लंडनला येण्यास सांगितले. चित्रकलाकृती घेऊन ते इंग्लंडला गेले. तेथे या चित्रांचे प्रदर्शनही भरवले. मात्र, राणी काही कामानिमित्त दुस-या देशात गेल्या होत्या. त्यांच्या येण्याच्या अगोदरच एके दिवशी त्यांच्या या प्रदर्शनाला आग लागल्याने अनेक चित्रकलाकृती खाक झाल्या.
मोजक्या 15 ते 20 चित्रकृती वाचवण्यात आल्या. ही चित्रे आजही इंग्लंडच्या म्युझियममध्ये गील यांच्या आठवणींची साक्ष देत आहेत. गील यांचे निवासस्थान भुसावळच्या रेल्वे हद्दीतच होते. त्यांनी 10 एप्रिल 1879 रोजी या शहरातच अखेरचा श्वास घेतला. त्यांची कबर भुसावळात आहे, असेही चौधरी यांनी व्याख्यानात सांगितले. व्यासपीठावर अध्यक्ष पुरुषोत्तम मेंडकी यांच्यासह पदाधिकाºयांची उपस्थिती होती.