धुळे- धुळ्यातील पोलिस श्वानपथकातील 'रॉकी' नामक कुत्र्याने कॉन्स्टेबल राजू जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. रॉकीच्या हल्ल्यात जाधव जखमी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेली माहिती अशी की, रॉकीचे जेवणाचे ताट बदलल्याने त्याने कॉन्स्टेबल जाधव यांच्यावर हल्ला केल्याचे पोलिस कर्मचारी काझी यांनी सांगितले. काझी हे रॉकीचा सांभाळ करतात. मात्र, जाधव यांना वेळीच 'रोकी'च्या तावडीतून सोडविण्यात आल्याने जाधव यांचा जीव वाचवता अाल्याचे अन्य पोलिसांनी म्हटले आहे.
'रॉकी'ची हाकलपट्टी करा- मागणी
धुळे पोलिसांच्या श्वानपथकातील कर्तबगार श्वान म्हणून 'रॉकी'ची ओळख आहे. मात्र, रॉकीचा इतिहास हा हिंसक राहिला आहे. यापूर्वीही त्याने अनेकांवर हल्ला केला होता. त्यामुळे 'रॉकी'ला पोलिस दलातून काढण्यात यावे, अशी मागणी जखमी राजू जाधव यांनी केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, Photos