आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रोझ डे’ने व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात;

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आठवड्यावर आलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’ सप्ताहाची सुरुवात गुरुवारी ‘रोझ डे’ने झाली. तरुणांनी गुलाबाचे फूल देऊन प्रेमाच्या आणाभाका घेतल्या.

सप्ताह चिरस्मरणीय करण्यासाठी तरुणांनी जोमात तयारी केली आहे. सप्ताहाचा प्रत्येक दिवस अगदी मनापासून साजरा करायचा असल्याचे अनेकांनी सांगितले. तसेच आपल्या प्रियकर, प्रेयसीला आवडणार्‍या सर्व गोष्टी पूर्ण करण्याचा निर्धारही अनेकांनी घेतला आहे. अनेक महिन्यांपासून आपले प्रेम मनात दडवून ठेवणार्‍यांनी यंदा प्रपोज करून टाकू, असे अनेकांनी ठरविले आहे.

मुंबईतून गुलाबाची आवक : ‘रोझ डे’निमित्ताने शहरात मुंबई, पुणे येथून डस्ट गुलाब मागविण्यात आले होते. शिरसोली येथूनही गुलाबाची मोठय़ा प्रमाणावर आवक झाली आहे. एरवी 2 ते 5 रुपयांत विकले जाणारे गुलाबाचे फूल गुरुवारी 15 ते 20 रुपयांपर्यंत विकले गेले.

असे दिवस...असे महत्त्व!
8 फेब्रुवारी ‘प्रपोज डे’ : अनेक दिवसांपासून मनात दडवून ठेवलेले प्रेम व्यक्त करून प्रपोज करतात.

9 फेब्रुवारी- ‘चॉकलेट डे’ : प्रेमातले अंतर दूर करण्यासाठी एकमेकांना चॉकलेट दिले जाते. यातून गोडवा निर्माण होतो.

10 फेब्रुवारी- ‘टेडी डे’ : एकमेकांना टेडी बेअर दिली जाते. खास करून मुली या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात.

11 फेब्रुवारी- ‘प्रॉमिस डे’ : प्रेमात अटी नसतात, ना नियम तुमच्या आयुष्यात जर कुणी असले तर सुख-दु:खात त्याची साथ सदोदित कायम रहावी, असे वचन या दिवशी घेतले जाते.

12 फेब्रुवारी- ‘हग डे’ : एकमेकांना मिठी मारण्याचा हा दिवस या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांच्या कुशीत विसावतात

13 फेब्रुवारी- ‘किस डे’ : तब्बल पाच दिवसांपासून सुरू झालेल्या प्रेमाचा प्रवास 13 फेब्रुवारी रोजी ‘किस डे’ने संपतो. यानंतर तरुणाईला व्हॅलेंटाइन डेचे वेध लागतात.

14 फेब्रुवारी- ‘व्हॅलेंटाइन डे’ : प्रेमाचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आपल्या जोडीदारासोबत आयुष्यभर प्रेमाने राहण्याचे प्रॉमिस या दिवशी केले जाते.