आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ मंडळात आरपीएफची 25 टक्के पदे रिक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- भुसावळ मंडळात आरपीएफमध्ये 25 टक्के पदे रिक्त आहेत. तरीही आरपीएफने प्रवासी रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देत या वर्षी ऑगस्टपर्यंत 20 हजार 368 केसेस दाखल करून 38 लाख12 हजार रुपये दंड वसूल केला. ही कामगिरी सरकारच्या विश्वासाला पात्र ठरणारी असल्याचे गौरवोद‌्वार डीआरएम महेशकुमार गुप्ता यांनी काढले.
आरपीएफ बॅरेकमध्ये शुक्रवारी सकाळी 30 वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. डीआरएम गुप्ता, आयुधनिर्माणीचे महाप्रबंधक तालुकवार, एडीआरएम प्रदीप बारापात्रे, वरिष्ठ अभियंता (समन्वय) दिव्यकांत चंद्राकार, विद्युत कारखाना प्रबंधक मनोज महाजन, उपायुक्त पी.एल.वर्मा, ए.के.स्वामी, पोलिस निरीक्षक आनंद महाजन यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला आरपीएफ, डॉग स्कॉड आणि बँड पथकाद्वारे उपस्थितांना मानवंदना देण्यात आली.
आरपीएफने वेळोवेळी आपली कार्यकुशलता दाखवली आहे. दहशतवादी हल्ला असो, प्रवासी वा रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेचा मुद्दा असो, आरपीएफची कामगिरी महत्त्वाची आहे. भुसावळ विभागात एक विशेष टास्क फोर्स स्थापन केल्याने चोऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याचे गुप्ता म्हणाले. तसेच तेजस्विनी पथकाची कामगिरीही समाधानकारक असल्याचे गुप्ता यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. त्यानंतर दोन संघांमध्ये रस्सीखेच स्पर्धा घेण्यात आली. 30 व्या वर्धापनदिनी रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाची मानवंदना स्वीकारताना डीआरएम महेशकुमार गुप्ता सुरक्षा बलाचे आयुक्त चंद्रमोहन मिश्र.

प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य
भुसावळिवभागात रेल्वे सुरक्षा बलाचे काम अत्यंत चांगले आहे. सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्यासह कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या अडचणी-समस्या जाणून घ्याव्यात, असे आवाहन आयुक्त चंद्रमोहन मिश्र यांनी केले. सहायक आयुक्त पी.एल.वर्मा ए.के.स्वामी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी आरपीएफने डीआरएम गुप्ता यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. तसेच रस्सीखेच स्पर्धेत विजयी झालेले नाशिकरोड स्थानकाचे निरीक्षक बी.डी.इप्पर यांना शिल्ड देण्यात आली.