आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिकीट खिडकीवर ‘आरपीएफ’ची नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अजय यादव यांनी गुरुवारी भुसावळ रेल्वे स्थानकावरील आरक्षण व जनरल तिकीट खिडकीला सकाळी 10.30 वाजता भेट दिली. तत्काळचे तिकीट काढण्यासाठीच्या रांगेतील प्रवाशांची त्यांनी तपासणी केली.

आरक्षण खिडकीवर तिकिटांचा काळाबाजार करताना गेल्या आठवड्यात जाममोहल्ला भागातील एका दलालाला रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी अटक केली होती. या पार्श्वभूमीवर तिकीट खिडकीवर रेल्वे सुरक्षा बलाने लक्ष केंद्रित केले आहे. तत्काळ तिकीट काढण्यासाठी प्रवाशांच्या रांगेत वारंवार कोणी उभा राहतो आहे का? याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजही चिकित्सकपणे तपासण्यावर भर देण्यात आला आहे. दरम्यान, प्रवाशांना आरक्षण खिडकीवर तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचा प्रकार निदर्शनास येताच थेट रेल्वे सुरक्षा बलाशी संपर्क साधावा, असे आवाहन निरीक्षक अजय यादव यांनी केले आहे.