आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महायुती तुटल्यास पुन्हा आघाडीचीच सत्ता : आठवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘शिवसेना व भाजपमध्ये जागावाटपावरून सुरू असलेल्या वादातून युती तुटल्यास राज्यात पुन्हा काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार येईल,’ अशी भीती रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवलेंनी जळगावात व्यक्त केली. राज्यात सध्या सरकार बदलाचे वातावरण असून महायुतीच्या २२५ जागा निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेले माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची असेल तर रिपाइंत यावे, असे आवाहनही त्यांनी केले. रिपाइंच्या मेळाव्यानिमित्त शहरात आले असता आठवलेंनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘गेल्या महिन्यात भाजप व शिवसेनेच्या नेत्यांना आम्ही ४७ जागा मिळण्याच्या मागणीचे पत्र दिले होते. त्यातील किमान १५ जागा मिळण्याची अपेक्षा आहे. भाजप व शिवसेनेने आपला वाद लवकर मिटवून रिपाइंलाही योग्य तो वाटा द्यावा,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ, चाळीसगाव, धुळे शहर, सिन्नर, देवळाली, श्रीरामपूर, शिर्डी या जागांसाठी रिपाइं आग्रही असल्याचे ते म्हणाले.

जैनांना तिकीट मिळेल असे वाटत नाही
घरकुल घोटाळ्याप्रकरणी आमदार सुरेश जैन कारागृहात असले तरी त्यांच्यावर आरोप आहेत ते सिद्ध झालेले नाहीत. त्यांना उमेदवारी मिळाली नाही तरी ते अपक्ष लढतीलच. पण सध्याची परिस्थिती पाहता शिवसेना त्यांना उमेदवारी देईल, असे वाटत नसल्याचे आठवले म्हणाले.