आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीच्या खाेलीतून 7 हजार रुपये लंपास, जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव  - स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी शहरात खोली करून राहणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या पर्समधून हजार ३०० रुपये चोरीस गेल्याची घटना रविवारी सकाळी ७.३० वाजता कोठारी मंगल कार्यालयाच्या परिसरात घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

गेल्या अाठ महिन्यांपासून जया जिजाबराव पाटील (रा.भोकरी, ता. मुक्ताईनगर) ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी कोठारी मंगल कार्यालयाच्या परिसरातील एका क्लासजवळ खोली करून राहत आहे. रविवारी सकाळी ७.३० वाजता जया तिच्या खाेलीच्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीकडे गेली हाेती. या वेळी चाेरट्याने तिच्या खोलीत प्रवेश करून बॅगमध्ये ठेवलेल्या पर्समधून हजार ३०० रुपयांची रोकड लंपास केली. १० मिनिटांनी जया खोलीत अाल्यानंतर तिला पर्समधील पैसे चाेरीस गेल्याचे कळले. या विषयी तिने मैत्रिणी खोली मालक ए. एन. पाटील यांच्याकडे चौकशी केली; परंतु पैसे कोणी चाेरले हे कळू शकले नाही. या प्रकरणी जयाने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

१५ दिवसांत दुसरी घडली घटना 
जया ज्या इमारतीमध्ये राहते तेथे आणखी ४-५ मुली रूम करून राहतात. आठ दिवसांपूर्वी जयाची मैत्रीण भाग्यश्री हिच्या खोलीतून सुद्धा ५०० रुपये चोरीस गेले होते. तर १५ दिवसांपूर्वी दोन मुली एटीएम केंद्रातून पैसे काढून खोलीकडे परतत असताना एका भामट्याने त्यांचा पाठलाग करून पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी मुलींनी पळ काढून सुटका केली होती. 

 

सीसीटीव्ही फुटेज तपासले 
जया हिच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या एका बंगल्याच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात अाले आहेत. पाेलिसांनी त्या कॅमेऱ्याचे फुटेज तपासले, परंतु त्यात बाहेरून त्या इमारतीमध्ये कोणीच शिरले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे घटना घडली त्या वेळी इमारतीत असलेल्या कोणीतरी जयाचे पैसे चाेरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...