जळगाव - जळगाव शहर लगतच्या गावांना येण्या-जाण्यासाठी मध्य पश्चिम रेल्वेच्या मार्गावर तीन रेल्वे गेट अाहेत. यापैकी पिंप्राळा रेल्वे गेटवरून दिवसाला तब्बल लाख वाहने ये-जा करीत असतात. शिवाजीनगर उड्डाणपूल व्यापारीपेठांसह ग्रामीण भागासाठी दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग अाहे. या पुलाचा पुनर्निमाण करणे गरजेचे अाहे. परंतु, पालिकेची अार्थिक परिस्थिती नसल्याने रेल्वे विभागामार्फत काम करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, असा प्रस्ताव अायुक्तांनी जिल्ह्यातील दाेन्ही खासदारांना बुधवारी पाठवला. तर शिवाजीनगरासह पिंप्राळा रेल्वे गेटवर पुलासाठी ७८ काेटी रुपये लागणार आहेत.
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेमार्गामुळे जळगाव शहराचे क्षेत्र हे तीन वेगवेगळ्या भागात विभागले गेले अाहे. शहरातील १०२ वर्षांपूर्वीचा शिवाजीनगर उड्डाणपुलाची स्थिती अत्यंत बिकट झाली अाहे. हा पूल केव्हाही काेसळण्याची भीती अाहे. शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटवरील उड्डाणपूल, सुरत रेल्वे गेटवरील उड्डाणपूल तसेच शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी खासदार ए.टी.पाटील खासदार रक्षा खडसे यांना प्रस्ताव देण्यास जून महिन्यात मान्यता दिली हाेती.
परंतु, तीन महिने उलटूनही प्रशासन हातावर हात धरून बसले हाेते. स्थायी समितीत नगरसेवकांनी अाक्रमक पवित्रा घेताच अाठवडाभरात प्रस्ताव तयार करण्यात अाला अाहे. तीन पानी प्रस्तावात शिवाजीनगर उड्डाणपुलांचे बांधकाम रेल्वे विभागामार्फत करून घेण्याची विनंती करण्यात अाली अाहे.
शहरात येण्यासाठी पाच रेल्वे गेट
शहरात मार्गक्रमित असलेल्या मध्य रेल्वे लाेहमार्गावरून दळणवळणासाठी अासाेदा, भादली कडगावकडे जाण्यासाठी एक रेल्वे गेट अाहे. तसेच शिवाजीनगर उड्डाणपूल, पिंप्राळा रेल्वे गेट, पश्चिम रेल्वेच्या लाेहमार्गावर दूध फेडरेशन जवळील रेल्वे गेट तसेच अाव्हाणे शिवारात एक रेल्वे गेट अाहे.
अशी अाहे पालिकेची स्थिती
महापालिकेला हुडकाेचे १० सप्टेंबर २०१४ अखेर ५१३ काेटींचे तसेच जिल्हा बँकेचे ५८ काेटींचे कर्ज फेडायचे अाहे. मनपाच्या उत्पन्नातून पालिका दर महिन्याला काेटी कर्ज फेडत अाहे. त्यामुळे महापालिकेस मूलभूत साेईसुविधांची देणी, कर्मचारी वेतनदेखील अदा करता येत नाहीत. सद्य:स्थितीत शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या पुनर्निमाणाचे काम अत्यंत महत्त्वाचे प्राथमिकतेने हाती घेणे अावश्यक अाहे. महासभेने २६ जून २०१५ राेजीच्या महासभेत पारित केलेल्या प्रस्तावानुसार उड्डाणपुलाचे बांधकाम तातडीने हाेण्यासाठी निधी उपलब्धतेसाठी काम रेल्वे विभागामार्फत करून घेण्यासाठी पाठपुरावा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली अाहे.
असा अाहे उड्डाणपूल
१४.५०मीटर: शिवाजीनगर उड्डाणपुलाची प्रस्तावित रुंदी.
१.५०मीटर: दाेन्ही बाजूस रुंदीत प्रस्तावित पादचारी मार्ग.
२००मीटर: पुलाची लांबी (दाेन्ही बाजूस गृहीत धरून)