आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Chief Dr Mohan Bhagwat Rejected Bulletproof Car At Bhusawal

RSS चे सरसंघचालक भागवतांनी नाकारली बुलेटप्रूफ कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत जळगावला जाण्यासाठी मंगळवारी पहाटे भुसावळ रेल्वेस्थानकावर उतरले होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने स्थानकाबाहेर बुलेटप्रूफ कारही तैनात ठेवण्यात आली होती. मात्र, भागवत यांनी बुलेटप्रूफ कार नाकारत अन्य कारने जळगावला जाणे पसंत केले.

भागवत यांच्या आगमनामुळे मंगळवारी पहाटे चार वाजेपासूनच रेल्वेस्थानकावरील बंदाेबस्तात वाढ करण्यात आली. जळगाव येथील बॉम्बशोधक पथकाने रेल्वेस्थानक परिसराची तपासणी केली. पुणे- पाटणा एक्स्प्रेस या गाडीने भागवत भुसावळ रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक चारवर उतरले. गाडी येताच सुरक्षा यंत्रणेने त्यांना गराडा घातला. पाेलिस उपअधीक्षक राेहिदास पवार, पाेलिस निरीक्षक बाळासाहेब केदारे, लाेहमार्ग पाेलिस ठाण्याचे निरीक्षक अानंद महाजन यांच्यासह अारपीएफचे निरीक्षक विनाेदकुमार लांजीवार अारपीएफचे जवान बंदाेबस्तासाठी तैनात होते. मात्र, स्थानकाबाहेर आल्यानंतर भागवत यांनी बुलेटप्रूफ कार नाकारली. त्याऐवजी स्वयंसेवकाच्या कारमध्ये बसून ते जळगावकडे रवाना झाले. त्यांच्या वाहनाच्या मागे पुढे सुरक्षा यंत्रणेचा मोठा ताफा होता.