आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओ एजंट आजपासून पुन्हा आपल्या मदतीला, खंडपीठाने दिली परवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आरटीओ कार्यालयात मोटारचालक-मालकांचे प्रतिनिधी म्हणून सहा आठवडे काम करण्याची परवानगी आरटीओ एजंटांना देण्यात आली आहे. त्यामुळे २९ दिवसांच्या बंदीनंतर म्हणजे मंगळवारपासून एजंट पुन्हा कार्यालयात काम करणार आहेत.
आरटीओ कार्यालयात एजंटशिवाय कामे करावीत, असे आदेश आयुक्त महेश झगडे यांनी दिले होते. या आदेशाला जळगावच्या जिल्हा मोटारचालक-मालक प्रतिनिधी युनियनने औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते.
एजंट बंदी लागू झाल्यानंतर नागरिकांना आपली कामे स्वत:च करावी लागत होती. नागरिकांना कार्यालयाबाबत पूर्ण माहिती नसल्याने, त्यांचे प्रचंड हाल होत होते. त्यामुळे कार्यालयात दिवसाला फक्त १० टक्केच काम होत होते. एजंट बंदीनंतर २८ जानेवारी रोजी जिल्हा मोटारचालक-मालक संघटनेने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.
दोन सुनावण्या झाल्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने निर्णय देत मोटारचालक-मालकांचे प्रतिनिधी म्हणून एजंटांना सहा आठवडे काम करू देण्यास परवानगी दिल्याचे आदेश केले आहेत. सोमवारी या निकालाची प्रत युनियनला प्राप्त झाली असून ती युनियनचे अध्यक्ष सरसण पणिकार आणि रज्जाक खान यांनी मिळवली आहे.